मुंबई : केंद्र सरकारने जगात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यांना पत्र पाठवले आहे. यामध्ये त्यांनी सतर्कता बाळगून काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. यावरच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रतिक्रिया दिली. पुढच्याला ठेच मागचा सावध, अशा पद्धतीने आपल्याला सावधगिरी बाळगावी लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.
चीन आणि कोरियामध्ये वाढत्या रुग्ण संख्येमुळे केंद्राने राज्य सचिवांना काळजी घेण्यासाठी पत्र पाठवले आहे. कोरियामध्ये कोरोनाची चौथी लाट आली असून या लाटेत बेड्स उपलब्ध होत नाहीयेत. ही गंभीर परस्थिती पाहता काळजी घेण्याच्या सूचना केंद्राने राज्यांना दिल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे. तसेच बिनधास्त पद्धतीन वागून चालणार नाही, आपल्या सर्वांना काळजी घ्यावी लागणार आहे. या केंद्राच्या आवाहनाचे पालन करण्याचे काम राज्य सरकार करणार असल्याचेही टोपे यांनी म्हटले आहे.
दरम्यान 20 फेब्रुवारीपासून चीनमध्ये दररोज कोरोना रुग्ण वाढत आहेत. तिथे दररोज एक हजारहून अधिक नवीन रुग्ण समोर येत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने राज्यांना काळजी घेण्याचे आवाहन करणारे पत्र पाठवले आहे.
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

