Share

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या शिक्षकांचे कुटुंबीय उघड्यावर, शासनाने मदत करावी शिक्षक समितीची मागणी!

Published On: 

औरंगाबाद : कोरोनाच्या काळात कर्तव्य बजावतांना कोविडमुळे मृत्यू होणाऱ्या कर्मचाऱ्यांना विमा कवच सानुग्रह साहाय्य लागू करण्याचा निर्णय वित्त विभागाने काढला आहे. मात्र अजूनपर्यंत यातील कुठल्याही शिक्षकांना या योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही. यामुळे शिक्षकांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे. शासनाने लवकरात लवकर हे प्रस्ताव मार्गी लावावे अशी मागणी प्राथमिक शिक्षक समितीने केली आहे.

राज्यातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या प्रमाणात कोव्हिड संबंधित कर्तव्य पार पाडत असल्यामुळे राज्यातील शिक्षकांनाही ५० लक्ष रुपयाचे विमा कवच सानुग्रह सहाय्य लागू करण्याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने १९ नोव्हेंबर २०२० शासनाकडे राज्याध्यक्ष उदय शिंदे, राज्य सरचिटणीस विजय कोंबे यांना निवेदन सादर केले होते. असे शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी सांगितले.

७ डिसेंबर २०२० च्या शालेय शिक्षण विभागाच्या पत्रास अनुसरून प्राथमिक शिक्षण संचालनालय, पुणे यांनी दि. ५ जानेवारी २०२१ रोजी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना याबाबत पत्र पाठवले आहे. मात्र राज्यातील अनेक प्राथमिक शिक्षकांचा कोव्हिड संबंधित कर्तव्य बजावतांना मृत्यू होऊनही अनेक जिल्ह्यातून संबंधित शिक्षकांचे परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आले नाहीत.

नागपूर जिल्ह्यातून केवळ दोन प्रस्ताव पाठविण्यात आले, तेही परिपूर्ण नसल्याने परत आले आहेत. कोरोनात कर्तव्य बजावतांना कोव्हिडमुळे मृत्यू झालेल्या शिक्षकांना शासनाच्या धोरणानुसार विमा कवच साहाय्य मिळण्यासंबंधाने प्रशासकीय यंत्रणांची कार्यवाही विषयक उदासीनता खेददायक आहे असे मत शिक्षक समितीने व्यक्त केले.

कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या शिक्षकांना विमा कवच / सानुग्रह सहाय्य मिळण्याबाबतचे परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे तात्काळ सादर करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी. याबाबत पंचायत समिती शिक्षण विभागाला आवश्यक आदेश निर्गत करावे अशी मागणी केली आहे. असे शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर,जिल्हा सरचिटणीस रंजित राठोड,जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सतीश कोळी यांनी कळविले आहे.

महत्त्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!