पुणे : भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी माजी खासदार संजय काकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेले काही दिवस राजकीय घडामोडीपासून दूर असणारे काकडे पुणे महापालिकेच्या निवडणुकीनिमित्त भाजपमध्ये पुन्हा सक्रिय होत असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. काकडे यांच्या नियुक्तीची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष व कोथरुड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
दरम्यान, या निवडीनंतर संजय काकडे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदे मध्ये त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबाबत मोठं विधान केलं आहे. मी उद्धव ठाकरेंना चांगलं ओळखतो. त्यांची महाविकास आघाडीत घुसमट होत आहे. आज ना उद्या ते नक्कीच आघाडीतून बाहेर पडतील, असं मोठं विधान संजय काकडे यांनी केलं आहे.
यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. ‘मी पुण्याचा आहे त्यामुळे संजय काकडे यांची विश्वासर्हता किती आहे हे मला ठाऊक आहे. विश्वासर्हता नसणाऱ्या लोकांच्या बोलण्याला काही महत्व देण्याचे कारण नाही. तसेच त्यांची विश्वासर्हता किती आहे ते तुम्ही पुणेकरांना विचारा’ असा सल्ला देखील त्यांनी पत्रकारांना दिला आहे. अजित पवार हे आज कोरोनाचा आढवा घेण्यासाठी पुण्यामध्ये आले होते. यावेळी ते माध्यमांशी सवांद साधत होते.
नेमकं काय म्हणाले होते संजय काकडे ?
मी गेल्या अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंना ओळखतो. त्यांचा संपूर्ण स्वभाव मला माहीत आहे. ते महाविकास आघाडीत गुदमरत आहेत. त्यांचं प्रत्येक स्टेटमेंट पाहा. त्यातून ते निराश दिसत आहेत. त्यांना जे काही चाललंय ते आवडत नाही. ते आज ना उद्या महाविकास आघाडीतून स्वत:हून बाहेर पडतील. ते अधिक काळ महाविकास आघाडीत राहणार नाहीत.शिवसेना गेली 25 वर्षे युतीत होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून मला वाईट वाटते.
महत्त्वाच्या बातम्या
- अग्नितांडव सुरूच : नितीन देसाई यांच्या स्टुडिओला लागली आग, जोधा अकबर सेट जळून खाक
- लोकप्रतिनिधींना घराबाहेर पडू देऊ नका, रस्त्यातच आडवा;उदयनराजे आक्रमक
- ‘मराठा आरक्षण फडणवीसांनी दिले; एकही मराठा मुख्यमंत्री मराठा आरक्षण देऊ शकला नाही’
- आयपीएल -14 चे उर्वरित सामने कधी आणि कोठे होतील? ‘हे’ आहेत पर्याय
- धक्कादायक! ‘प्रोटोकॉल’ तोडून झारखंडच्या मुख्यमंत्र्यांकडून मोदींच्या संभाषणाचा मजकूर व्हायरल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

