🕒 1 min read
मुंबई : एक काळ होता तेव्हा टाटा सफारीचं वादळ संपूर्ण भारतभर घोंगावत होत. सफारी म्हणजे एक शान होती मात्र जसा जसा काळ बदलत गेला तसा तसा मार्केट मधील स्पर्धेत सफारी मागे पडत गेली. मात्र आता फेब्रुवारीमध्ये लाँचिंगपूर्वी टाटा मोटर्सने नवीन 2021 टाटा सफारी एसयूव्ही सादर केली आहे. ही कार मुळात टाटाच्याच हॅरियरचं मोठं व्हर्जन आहे.
कंपनीने नुकतीच घोषणा केली आहे की, सफारी एकूण सहा व्हेरियंट्समध्ये सादर केली जाणार आहे. यामध्ये XE, XM, XT, XT+, XZ आणि XZ+ या व्हेरियंट्सचा समावेश असेल. तसेच ईपीबी (इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक) आणि एका मोठ्या पॅनरोमिक सनरूफप्रमाणे काही टॉप फीचर्सना ही कार सपोर्ट करेल. तसेच अधिक नियंत्रणासाठी यामध्ये ESP आधारित टेरेन रिस्पॉन्स मोडही देण्यात आला आहे. या कारच्या बुकिंगला 4 फेब्रुवारीपासून सुरुवात केली जाणार आहे.
नवीन टाटा सफारी 3 रो वर्जनसह सादर करण्यात आली आहे. या कारमध्ये 6-7 जण आरामात बसू शकतात. कंपनीने या एसयूव्हीमध्ये अनेक प्रिमियम फिचर्स दिले आहेत. या कारमध्ये 7 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टिम एक्सएम ट्रिममध्ये उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तर ऑटो-सेन्सिंग वायपर्स, ऑटो हेडलँप, टीपीएमएस, आयआरए कनेक्टेड कार अॅपसारखे फीचर्स एक्सटी ट्रिममध्ये उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. हायर-स्पेक ट्रिम XZ मध्ये Letherette सीट्स, Terrain Response System, R 18 machined अलॉय, कॅप्टन सीट्स, Xenon HD प्रोजेक्टर हेडलँप सोबतच अनेक सुविधा दिल्या जाणार आहेत. या करची किंमत 16 ते 24 लाख रुपये असू शकते. दरम्यान कंपनीने या कारमध्ये असे काही फिचर्स दिले आहेत, ज्यामुळे ही कार या वर्षातली सर्वात बेस्ट एसयूव्ही ठरू शकते.
LED DRLs सह प्रोजेक्टर हेडलॅम्प्स
टाटा सफारीच्या प्रत्येक वेरियंटमध्ये प्रोजेक्टर हेडलॅम्प्स दिले जातील. यासोबत तुम्हाला LED डेटाईम रनिंग लॅम्प्सही दिले जातील, जे इंडिकेटर्सदरम्यान डबल होतील.
चारही टायर्समध्ये डिस्क ब्रेक्स
हॅरियरमध्ये केवळ फ्रंट (पुढच्या बाजूचे) टायर्समध्ये डिस्क ब्रेक्स देण्यात आले होते. परंतु टाटा सफारीच्या प्रत्येक टायरमध्ये तुम्हाला डिस्क ब्रेक्स मिळतील. विशेष म्हणजे सफारीच्या प्रत्येक वेरियंटमध्ये ही सुविधा दिली जाईल.
रूफ रेल्स
2021 टाटा सफारीमध्ये स्लायलिश रूफ रेल्स देण्यात आले आहेत, जे या गाडीला अधिक प्रिमियल लुक देतात. रुफ रेल्सवर सफारीचं ब्रँडिंग करण्यात आलं आहे.
बॉस मोड
बॉस मोड एक असं बटण आहे ज्याद्वारे मागे बसलेला प्रवासी पुढे बसलेल्या प्रवाशाची सीट पुढे ढकलू शकतो. यामुळे मागे बसलेल्या प्रवाशाला स्वतःच्या सोयीने आरामात बसता येतं.
टिल्ट आणि टेलीस्कोपिक स्टियरिंग व्हील
2021 टाटा सफारीमध्ये टिल्ट आणि टेलीस्कोप अॅडज्सटेबल स्टियरिंग व्हील देण्यात आलं आहे, जे प्रत्येक वेरियंटमध्ये मिळेल. यामुळे रायडरला (चालकाला) परफेक्ट रायडिंग पोझिशन मिळते.
रिक्लायनिंग सेकेंड रो सीट्स
सफारीमध्ये रिक्लायनिंग सेकेंड रो सीट्स मिळतात ज्या रियर पॅसेंजर्ससाठी खूपच आरामदायक आहेत. लांबच्या प्रवासासाठी जात अताना हे फिचर प्रवाशांसाठी खूप महत्त्वाचं आहे.
सेफ्टी टच
2021 टाटा सफारी डुअल फ्रंटल एयरबॅग्ससह सादर करण्यात आली आहे. या कारमध्ये तुम्हाला रिवर्स पार्किंग सेन्सर्स, ईबीडीसह एबीएस, ईएसपी, हिल होल्ड असिस्ट, रोल ओवर मीटिगेशन, ट्रॅक्शन कंट्रोल, कॉर्नर स्टेबिलिटी आणि ब्रेक डिस्क वायपिंग फिचर्स देण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
- जिल्हा नियोजन बैठकीत नारायण राणे व विनायक राऊत यांच्यात राडा; उदय सामंत यांची मध्यस्थी
- तृप्ती देसाईंच्या मागणीवर माहूरगड विश्वस्तांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…
- शेतमाल विक्रीचे कसब शेतकऱ्याने अंगिकारले तर निश्चित फायदा होईल : अशोक चव्हाण
- केंद्र पुरस्कृत सिंचन प्रकल्प पुढील दोन वर्षात पूर्ण करणार – जयंत पाटील
- तृप्ती देसाई यांच्या विरोधात बाह्मण महासंघाचे पुण्यात ‘जोडे मारो’ आंदोलन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

