Share

अमिताभ बच्चन, अजय देवगण यांचा ‘Runway 34’ चित्रपटचा ट्रेलर प्रदर्शित

Published On: 

मुंबई : अजय देवगणने विमान अपघात होण्यापासून रोखलं की इतर कुठली गंभीर घटना घडली, असे प्रश्न मनात उपस्थित करणारा उत्कंठावर्धक ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ‘रनवे 34’ असं या चित्रपटाचं नाव आहे. या चित्रपटाचा ट्रेलरवरून अजयचं पात्रं रहस्यपूर्ण असल्याचं दिसून येत आहेत. त्याच्यासोबत को-पायलटची भूमिका अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने साकारली आहे.

अजय आणि रकुल मिळून काहीतरी सत्य लपवतायत आणि ते सत्य नेमकं काय आहे, याचं उत्तर मात्र प्रेक्षकांना चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच मिळू शकेल. या चित्रपटाची कथा सत्य घटनेवर आधारित आहे. कॅप्टन विक्रांत खन्ना यांची भूमिका अजयने साकारली आहे. यामध्ये बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन बोमन इराणी, अंगिरा धर, आकांक्षा सिंह यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

रनवे 34 या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण एफ फिल्म्स, कुमार पाठक, विक्रांत शर्मा, संदीप केवलानी, तारलोक जेठी, हस्नैन हुसैनी आणि जय कनुजिया यांनी केली आहे. हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर 29 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!