Share

सातबाऱ्यावर नाव लावण्यासाठी तलाठ्याने मागितले पाच हजार

Published On: 

औरंंगाबाद : तक्रारदाराने आणि तक्रारदाराच्या सोसायटीत राहणाऱ्याने खरेदी केलेल्या रो-हाऊसची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी पाच हजाराची लाच घेणाऱ्या तलाठ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि.२२) दुपारी ग्रामपंचायत कार्यालय वळदगांव येथे करण्यात आली. पुनमसिंग बंकटसिंग डोंगरजाळ (वय ५७,रा.बेदवाडी,परसोडा,ता.वैजापुर) असे लाचखोर तलाठ्याचे नाव आहे.

तक्रारदाराने सातारा परिसरात रो-हाऊस खरेदी केले असून त्या रो-हाऊसची सातबाऱ्यावर नोंद करण्यासाठी वळदगांव येथील तलाठी पुनमसिंग डोंगरजाळ यांच्याशी संपर्क साधला होता. त्यावेळी तलाठी डोंगरजाळ यांनी तक्रारदाराला तुम्ही आणि तुमच्या सोसायटीत राहणाऱ्याने प्रत्येकी ३ हजार रूपये प्रमाणे ६ हजार रूपये लाच देण्याची मागणी केली होती.

तडजोडीअंती तक्रारदाराकडून २ हजार आणि त्यांच्या सोसायटीत राहणाऱ्याकडून ३ हजार रूपये असे एकून ५ हजार रूपये देण्याचे ठरले होते. तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. त्यानंतर सापळा लावून त्याला अटक करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!