औरंगाबाद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शहरातील तापडिया नाट्यगृहात शिवसेना महिला आघाडीने कार्यशाळेचे आयोजन केले होती. यासाठी शिवसेनेच्या मुंबईतील अनेक महिला पदाधिकारी देखील कार्यक्रमाला बोलविण्यात आल्या होत्या. शिवसेनेच्या उपनेत्या विशाखा राऊत यांनी भाषणात महिलांना उद्देशून अनेक बाबी मांडल्या. त्यानंतर मुंबईनंतर शहरातील महिला आघाडी कशी सक्रीय असल्याचे त्यांनी सांगितले.
विशाखा राऊत यांनी मुख्यमंत्री सर्वांची काळजी घेत असून महिलांना स्वतःच्या पायावर उभ राहण्यासाठी अनेक उपक्रम राबवीत असल्याचे त्यांनी उपस्थितांना सांगितले. लोणचे आणि पापड म्हणजेच स्वयंरोजगार अशी संकल्पना आता राहिली नसून महिलांनी आता त्यापलीकडे जावून पैठणी साडी तयार केली पाहिजे. विविध उद्योजात आपली छबी दाखवून स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, भाषणात बोलत असताना त्यांनी रश्मी ठाकरे यांनी त्यांना दिलेल्या आदर्शाबद्दल त्या उपस्थितांना सांगत असतांना त्या म्हणाल्या कि, महिलांनी सोनिया गांधींचा नाही तर सुषमा स्वराज यांचा आदर्श राजकारणात घ्यावा. स्वराज जेंव्हा ठाकरे कुटुंबियांना भेटण्यासाठी आल्या होत्या, तेंव्हा त्यांनी रश्मी यांचे कौतुक करत, त्या नशीबवान असल्याचे सुषमा स्वराज यांनी सांगितल्याच्या आठवणींना त्यांनी या दरम्यान, उजाळा दिला.
महत्त्वाच्या बातम्या
- दु:खद! अर्जुन पुरस्कार प्राप्त बॅडमिंटनपटू नंदु नाटेकर यांचे निधन
- ‘पूरग्रस्तांना प्रत्येकी एक लाखाची तातडीने मदत करा’ ; गोपीचंद पडळकरांची मागणी
- औरंगाबाद-अहमदनगर रेल्वेमार्गाचे होणार सर्वेक्षण, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची पत्राद्वारे खा. जलील यांना माहिती!
- पश्चिम महाराष्ट्रातील महापुराबाबत संभाजीराजेंनी राज्यसभेत उपस्थित केला महत्वाचा प्रश्न
- कोरोनाचे संकट संपल्यानंतर वेरुळ महोत्सवाचे नियोजन करण्यावर लक्ष, अमित देशमुख यांचे आश्वासन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

