सगळीकडचे प्रदुषणाचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे बरेचसे वेगवेगळे रोग येत आहेत. सध्या पावसाळा ऋतू संपत जरी असला, तरीही काही ठिकाणी अजुनही पाऊस पडत आहे. या पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साथीचे आजार होण्याची भिती असते. त्यामध्ये डेंग्यूचे प्रमाणही खूप असते. तर आज आम्ही तुम्हाला डेंग्यू होण्याच्याआधी तुम्ही कोणती काळजी घेतली पाहिजे. तुम्ही कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत हे सांगणार आहेत.
- खबरदारी घ्या –
डास चावण्यापासून वाचण्यासाठी घराबाहेर असताना रेपेलंट वापरा. तसेच, डास टाळण्यासाठी लांब बाह्यांचे शर्ट आणि पॅंट घाला. जेणेकरून डास तुम्हाला चालणार नाहीत. - खालील लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका –
डेंग्यूच्या सामान्य लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, डोळा दुखणे, सांधे आणि हाडे दुखणे, पुरळ, मळमळ आणि उलट्या यांचा समावेश होतो. त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. - प्रतिजन चाचणी –
डेंग्यू हा एक प्राणघातक आजार आहे, त्यामुळे तो गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. डेंग्यू शोधण्यासाठी डेंग्यू विषाणू प्रतिजन आणि प्रतिपिंड चाचण्या केल्या जातात. डासांपासून दूर राहा, विशेषतः सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात देशात डेंग्यूचे रुग्ण वाढू लागतात. - संतुलित आहार घ्या –
बहुतेक रुग्णांमध्ये, रोग प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे कमी असलेला रोग वाढतो. यामुळे व्हिटॅमिन-बी12, व्हिटॅमिन-डी आणि व्हिटॅमिन-सीची कमतरता होऊ शकते. त्यामुळे भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय नारळ पाणी, फळे आणि भाज्या यांचा समावेश आहारात करा. पुरेशी झोप घेत जा.
ताप आल्यास लवकरात लवकर डेंग्यूची चाचणी करा. त्यातबरोबर रक्त तपासणीही करून घ्या म्हणजे प्लेटलेट्सची संख्या कळू शकेल.
महत्वाच्या बातम्या :
- Uday Samant । कोकणात होणार ४ हजार २०० कोटींची गुंतवणूक – उदय सामंत
- INC। प्राथमिक स्वरुपाची चर्चा झाली होती, पण…; अशोक चव्हाणांनंतर माणिकराव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
- Vinayak Raut | “एकनाथ शिंदेंनी फडणवीसांविरोधात आकांडतांडव केलं होतं, तेव्हा उद्धव ठाकरेंनी समजूत काढली”
- BJP । भुजबळांना ‘पुन्हा’ अंडासेल दाखवण्याची वेळ आलीये; भाजपाचा इशारा
- Government Job Update | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत विविध पदांसाठी भरती


