Share

Jubin Nautiyal | प्रसिद्ध गायक जुबीन नौटियालने शेअर केली हेल्थ अपडेट, म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

Jubin Nautiyal | मुंबई : बॉलीवूडला अनेक हिट आणि सर्वोत्कृष्ट गाणी देणारा गायक जुबीन नौटियाल (Jubin Nautiyal) त्याच्या घराच्या पायऱ्यांवरून पसरून पडला होता. त्यानंतर तो जखमी झाल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. इमारतीच्या जिन्यावरून पडल्याने त्याच्या कोपऱ्याला आणि डोक्याला किरकोळ दुखापत झाली. त्याचबरोबर त्याची कोपरी तुटली असून बरगड्यांनाही तडे गेल्याची माहिती समोर आली आहे. अशात जुबीनने नुकतीच त्याच्या तब्येतीबद्दल अपडेट (Health Update) दिली आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने आपल्या प्रकृतीबद्दलच्या चाहत्यांना कळवले आहे.

‘तू सामना आये’, ‘माणिके’, ‘बना शराबी’ यासारखी गाणे गाऊन रसिकांचे मनोरंजन करणारा गायक जुबीन नौटियाल काल 2 डिसेंबर रोजी जिन्यावरून पडल्याची माहिती समोर आली होती. दरम्यान, त्याला अनेक जखमा झाल्या असून डॉक्टरांनी त्याला उजव्या हाताचे ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता. अशात त्याने त्याच्या ट्विटर हँडलवरून आपले आरोग्य चांगले असल्याची माहिती दिली आहे.

जुबीन नौटियालने त्याच्या ट्विटर अकाउंटवर एक फोटो शेअर करत आपल्या तब्येतीची माहिती दिली आहे. त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की,”तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी केलेल्या प्रार्थनासाठी धन्यवाद! देवाची माझ्यावर कृपा होती म्हणून माझा मोठा अपघात होता होता टाळला. मला आता डिस्चार्ज मिळाला असून मी हळूहळू बरा होत आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमासाठी आणि प्रार्थनासाठी धन्यवाद! ” जुबीनने शेअर केलेल्या या फोटोमध्ये तो हॉस्पिटलच्या बेडवर बसलेला आहे. त्याचा उजवा हात फ्रॅक्चर झाल्याचे या फोटोमध्ये स्पष्ट दिसत आहे. या फोटोमध्ये त्याचे हास्य पाहून चाहत्यांना नक्कीच थोडा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, मध्यंतरी एका वादग्रस्त प्रकरणामुळे जुबिनला अटक करायची मागणीदेखील झाली होती, तेव्हा तो चांगलाच चर्चेत आला होता. जुबिनने ‘रातां लांबियां’, ‘लुट गए’, आणि ‘तुझे कितने चाहने लगे हम, तुम यासारख्या यासारखी कित्येक सुपरहीट गाणी दिली आहेत.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!