मुंबई : ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना द गॅबा स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने ३ विके्टसने विजय मिळवत इतिहास रचला आहे. या विजयासह भारताने २-१ ही मालिका जिंकली आहे. भारताचा हा ऑस्ट्रेलियन भूमीतील सलग दुसरा मालिका विजय आहे. याचबरोबर गेल्या ३३ वर्षांचा ऑस्ट्रेलियाचा ब्रिस्बेन कसोटीत अपराजित राहण्याचा विक्रमही भारताने खंडीत केला आहे.
दरम्यान, भारतीय टीमच्या विजयात रिषभ पंतने मोलाचे योगदान दिले. विशेष म्हणजे टीममध्ये स्थान मिळवण्यासाठी देखील रिषभ पंतला संघर्ष करावा लागला होता. रिषभ पंतवर कसोटी सामन्यात देखील बऱ्याच टीका झाली होती. मात्र या बहाद्दर पठ्ठ्याने आपल्या झुंजार टीकाकारांची बोलती बंद केली आहे. पंतने नाबाद 89 रनची खेळी करत, अशक्य वाटणारा विजय मिळवून दिला.
नुकताच भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा पार पडला. या दौऱ्यातील एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी पंतची भारतीय संघात निवड झाली नव्हती. मात्र, त्यानंतरच्या कसोटी मालिकेत त्याने अप्रतिम खेळ केला. त्याने या मालिकेदरम्यान आक्रमक शैलीत फलंदाजी केली. त्यामुळे त्याला मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये पुन्हा संधी मिळाली पाहिजे, असे हॉगला वाटते. पंतने आतापर्यंत भारताकडून १६ एकदिवसीय आणि २८ एकदिवसीय सामने खेळले आहेत.
पंतचे भारताच्या एकदिवसीय आणि टी-२० संघात पुनरागमन झाले पाहिजे. भारताने श्रेयस अय्यर किंवा संजू सॅमसनला वगळून पंतला एकदिवसीय आणि टी-२० संघात संधी दिली पाहिजे. त्याच्याविरुद्ध गोलंदाजी करणे फार अवघड आहे. कारण, मैदानाच्या चारही कोपऱ्यांमध्ये फटके मारण्याची त्याच्यात क्षमता आहे. तो कोणत्याही गोलंदाजाविरुद्ध मोठे फटके मारू शकतो, असे हॉग म्हणाला.
महत्वाच्या बातम्या
- बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याचे अनावरण करताना उद्धव ठाकरे भावूक, म्हणाले…
- अजित पवार यांना आमंत्रण दिलं होतं, पण ते का आले नाहीत माहित नाही – किशोरी पेडणेकर
- अजित पवार बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी अनुपस्थित, चर्चांना उधान
- बाळासाहेबांचा पुतळा पाहताच चंद्रकांत खैरेंचा कंठ आला दाटून !
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते बाळासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण !


