Share

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची आर्थिक व मानसिक कुचंबणा दूर करा, शिक्षक मंत्र्यांना साकडे!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : शिक्षक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियुक्ती पदोन्नती वेतन श्रेणी मिळत नाही. राज्यातील अशा विविध शाळांमधील कर्मचाऱ्यांची आर्थिक व मानसिक कुचंबणा होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांनी महामंडळाला म्हटले आहे.

महामंडळाने याबाबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना निवेदन देत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. महामंडळाने यात म्हटले आहे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिक्षक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण केली आहे. अशा कर्मचाऱ्यांना शिक्षक पदी नियुक्ती, पदोन्नती, वेतन श्रेणी मिळायला हवी. वर्षांपासून शिक्षकेत्तर कर्मचारी संवर्गातून संस्थेच्या पूर्वपरवानगीने तसेच शिक्षकेत्तर पदाचा सर्व कार्यभार सांभाळत शिक्षक या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करूनही नियुक्ती पदोन्नती मिळाली नाही.

शिक्षकेत्तर कर्मचारी यांना शिक्षक पदासाठी शैक्षणिक पात्रता धारण करणार्‍या कर्मचार्‍यांना २५ % राखीव जागेनुसार अनुशेष भरण्यात येत होता. परंतु १३ ऑक्टोबर २००० पासून शंभर टक्के अनुदान शाळेत शिक्षण सेवा योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या नियुक्तीस नवीन मान्यता समजून शिक्षण सेवक या संवर्गात नियुक्ती देण्यात येत आहे. हे संयुक्तिक नाही शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी शैक्षणिक पात्रता वाढ होऊनही त्यांना सेवेतून वेतनश्रेणीत मान्यता मिळत नसल्याने त्यांचे नुकसान होत आहे. कर्मचाऱ्यांची आर्थिक व मानसिक कुचंबणा थांबवित वेतनश्रेणीतच मान्यता द्यावी अशी मागणी महामंडळाचे अध्यक्ष वाल्मीक सुरासे, कार्याध्यक्ष केशव पाटील यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!