Share

Sanjay Raut | “…तर हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र बंद होईल”; संजय राऊतांचा भाजपाला इशारा 

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Raut | मुंबई :  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsinh Koshyari) आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून राजकीय पक्ष आणि विविध संघटनांनी आज पुणे बंदची हाक दिली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), संभाजी ब्रिगेड आणि इतर काही संघटना बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत. यासंदर्भात बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपाला इशारा दिला आहे.

ते म्हणाले, “आज पुण्यात बंद आहे. पुणे जिल्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे. त्यांचं संपूर्ण काम पुणे आणि रायगडातून पुढे गेलं. आज पुण्यात कडकडीत बंद सुरू असेल, तर त्याची दखल केंद्र सरकारने घ्यायला हवी, महाराष्ट्र सरकारने आणि राज्यपालांनी घ्यायला हवी.”

“राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राचा परिणाम महाराष्ट्रावर झाला नाही हे पुणेकर दाखवून देत आहेत. बंदचं लोण संपूर्ण महाराष्ट्रात पसरत गेलं तर हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र बंद होईल,” असं म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपाला सुनावलं आहे.

राज्यपाल राष्ट्रपतींचे प्रतिनिधी असले तरी ते गृहमंत्रालयाच्या अधीन येतात. त्यामुळे राज्यपालांच्या नियुक्त्यांवर गृहमंत्रालय काम पाहतं. त्यांचे राजकीय बॉस हे गृहमंत्रीच असतात. त्यामुळे त्यांनी घटनात्मक प्रमुख असलेल्या राष्ट्रपतींऐवजी आपल्या राजकीय बॉसला पत्र लिहिलं असल्याची टीका संजय राऊत यांनी केलीय.

पुढे ते म्हणाले, “१७ डिसेंबरला शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि संपूर्ण महाविकासआघाडीचा मोर्चा आहे. हा त्याच कारणासाठी आहे. आमचे दैवत शिवरायांचा, महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान झाला आहे. त्याविरोधात हा मोर्चा आहे. याचीही दखल केंद्र सरकारला घ्यावी लागेल.”

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!