Share

मुंबईसह महाराष्ट्रात ड्रोन हल्ल्याचं सावट; काय आहे प्रकरण जाणून घ्या

Published On: 

मुंबई: मुंबईसह महाराष्ट्रात ड्रोन हल्ला (Drone Attack) करण्याचा कट असल्याची माहिती समोर आली आहे. हल्ल्यांबाबतचं संभाषण चौकशी यंत्रणांना कळल्यानं पोलीस यंत्रणा खडबडून जागी झालीय. तसेच महाराष्ट्रात ड्रोन हल्ला जर झाला तर महाराष्ट्राकडे अँटी-ड्रोन यंत्रणाही नाही असं महाराष्ट्र सायबर पोलिसांनीही मान्य केलं आहे. महाराष्ट्र सायबर आयजी यशस्वी यादव यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

महाराष्ट्र सायबर आयजी यशस्वी यादव (Maharashtra Cyber IG Yashasvi Yadav) म्हणाले, दहशतवादी सहानुभूती बाळगणारे ड्रोन हल्ले, रासायनिक हल्ले आणि सायबर हल्ल्यांबद्दल डार्क नेटवर बोलताना दिसतात. पृष्ठभागाच्या जाळ्याच्या तुलनेत डार्क नेट (Dark Net) ९९ टक्के आहे. टोर ब्राउझर डार्क नेटमध्ये वापरला जातो, जो सहज पकडता येत नाही. कारण त्यात अनेक प्रॉक्सी बाऊन्सिंगचा वापर केला जातो, अशी माहिती यादव यांनी दिली आहे.

ड्रोन हल्ला याबाबत आपण अनेकदा जम्मू काश्मीरच्या बाबतीत ऐकत आलो आहोत. मात्र आता मुंबईसह राज्यातील इतर महत्वाच्या शहरांवर हा हल्ला करण्याचा कट उघडकीस आला आहे. ड्रोन हल्ल्यात २० किमी ते ३० किमी अंतरावरूनही हल्ला केला जाऊ शकतो. ड्रोनवर पेलोड बसवता येतात. याशिवाय, त्यांना बॅकट्रॅक करणं फारसं सोपं नाही. जर एखाद्या गुन्हेगारानं मोबाईल फोन वापरला तर त्याचा आयएमईआय (IMI Number) क्रमांकावरून शोध लावला जाऊ शकतो, परंतु ड्रोन मागे टाकून गुन्हेगाराचा शोध लावता येत नाही. त्यामुळे महाराष्ट्रात लवकरात लवकर अँटी-ड्रोन यंत्रणा कार्यरत करणे आवश्यक झाले आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!