Share

दातांचा पिवळेपणा एका मिनिटात घालवा !

Published On: 

🕒 1 min read

वेब टीम- दात पिवळे होण्याची समस्या अनेकांना असते. मात्र, सर्वात आधी आपण लक्षात घेतले पाहिजे की, दात पिवळे होण्यामागे कोणत्याही आजाराचं कारण नसतं. अस्वच्छपणा आणि चुकीच्या पद्धतीने ब्रश करणे, हे यामागील कारणे आहेत. धुम्रपानामुळेही दात खराब होतात. तसेच चहा-कॉफिचं अतिसेवही याला कारणीभूत ठरु शकतं.

दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी अनेकजण डेंटिस्टचे उंबरठे झिजवताना दिसतात. मात्र, असेही काही घरगुती उपाय आहेत, ज्यामुळे दातांचा पिवळेपणा आपण दूर करु शकतो.

बेकिंग सोडा आणि लिंबू रसाची पेस्ट आपण रोजच्या जेवणावेळी अनेकदा वापरत असतो. आपल्या बहुतेक जणांच्या घरी या दोन्ही वस्तू उपलब्धही असतात. दात पांढरे शुभ्र करण्यासाठी सोडा आणि लिंबू अत्यंत परिणाम कारक आहेत.

बेकिंग सोडा खरखरीत असल्याने तो दातांवर स्क्रबर म्हणजेच घासण्याचं काम करतो, तर लिंबात सायट्रक असिड असतं, ज्यामुळे दात स्वच्छ होण्यास मदत होते.

बेकिंग सोडा आणि लिंबाच्या पेस्टचं मिश्रण करुन ते दातांना लावा. त्यासाठी चमचाभर बेकिंग सोडा घेऊन, त्यात लिंबाचा रस एकत्र करा आणि त्याचा घट्ट पेस्ट तयार करा. त्यानंतर ट्युथब्रशने ही पेस्ट दातांना लावा. मिनिटभर पेस्ट दातांनाच राहू द्या, त्यानंतर चूळ भरा आणि तोंड स्वच्छ करा.

अर्थात, हा झाला घरगुती उपाय. मात्र, दातांमध्ये काही समस्या असेल, तर तुमच्या डेंटिस्टला जाऊन भेटून त्यांचा सल्ला घेणं अधिक योग्य. पण या उपायामुळे नक्की फरक पडेल, यात शंका नाही.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!