पुणे : देशातील ५ राज्यांच्या विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी (केंद्र शासित प्रदेश) विधानसभा निवडणुकांसाठी तारखा जाहीर केल्या आहेत. यामुळे राजकीय वातावरण चांगलच तापलेलं दिसून येत आहे. भाजपला फारसं यश मिळवता न आलेल्या पश्चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू या राज्यात कमळ फुलवण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.
आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची केरळ मध्ये भाजपशी युती होणार आहे, अशी घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात केली आहे. केरळ सोबतच तामिळनाडू मध्ये देखील रिपाइं भाजप सोबत जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
‘तामिळनाडू मध्ये ए आय डी एम के आणि भाजप सोबत रिपब्लिकन पक्षाची युती होणार असून एनडीए म्हणून तिथे रिपाइं ला 2 जागा सुटणार आहेत,’ अशी माहिती आठवलेंनी दिली आहे. तर, आसाम आणि पश्चिम बंगाल मध्ये रिपाइं चे प्रत्येकी 15 जागा लढविण्याची तयारी करण्यात आल्याचे देखील रामदास आठवले यांनी सांगितले आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी आठवलेंनी उत्तर प्रदेशचा दौरा केला होता. २०२२ मधील युपी विधानसभा निवडणुकीत रिपाइं भाजपसोबतच लढेल अशी घोषणा आठवलेंनी युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या भेटीनंतर केली होती.
महत्वाच्या बातम्या
- अधिवेशन संपताच राज्य सरकारचा झटका;सामान्यांसह शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणार
- मनसुख हिरेनांच्या पत्नीसाठी सचिन वाझे म्हणजे ओसामा बिन लादेनच
- ‘देशात राहुल गांधींना आणि राज्यात नाना पटोलेंना कोणीही महत्व देत नाही’
- अपघातांचे प्रमाण वाढल्यानंतर शासनाला जाग, घेतला ‘हा’ निर्णय
- ‘देवेंद्रजींना पुन्हा यावचं लागेल, अजितदादा तुम्ही पण या…’ भाजप नेत्याची विधानसभेतच ‘पुन्हा’ साद
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

