Share

तलवार-गुप्ती बाळगणारा पुंडलिकनगर पोलिसांच्या ताब्यात

Published On: 

औरंंगाबाद : धारदार तलवार आणि गुप्ती बाळगणाऱ्या युवकास पुंडलिकनगर पोलिसांनी रविवारी (दि.३०) सायंकाळी गजाआड केले. ऋषिकेश महेंद्र दहिवाल (वय २०, रा.मोतीनगर, गारखेडा परिसर) असे तलवार आणि गुप्ती बाळगणाऱ्या युवकाचे नाव आहे.

गारखेडा परिसरातील मोती नगरात राहणाऱ्या ऋषिकेश दहिवाल याच्याकडे तलवार आणि गुप्ती असल्याची माहिती पुंडलिकनगर पोलिसांना मिळाली होती. पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली.

यात विशेष पथकाचे उपनिरीक्षक प्रविण मुळे, जमादार राजेश यदमळ, जाधव, निकम, धुळे आदींच्या पथकाने ऋषिकेश दहिवाल याच्या घरावर रविवारी सायंकाळी छापा मारला. पोलिसांनी ऋषिकेश दहिवाल याच्या बेडरूममधील कपाटाची झडती घेवून एक तलवार आणि गुप्ती जप्त केली. याप्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!