मुंबई : १२ वर्षापुर्वी झी मराठीवर सारेगम लिटील चॅम्प या गायनाच्या कार्यक्रमाने उभ्या महाराष्ट्राला वेड लावले होते. याच कार्यक्रमातील पंचरत्नापैकी एक आर्या अंबेकर. आर्याने गायनाने त्या कार्यक्रमात जे वेड लावले ते आजही कायम आहे. आजही तिने गायलेल्या गाण्याना तरुणाईतुन पंसती मिळत आहे. तीचा आज वाढदिवस.
नागपुरमध्ये जन्म झालेल्या आर्या अंबेकरला गायनाचा वारसा हा तिच्या आईकडून मिळाला. वयाच्या साडेपाच वर्षापासुन तिने शास्त्रीय गायनाचे धडे घ्यायला सुरु केले. २००८ मध्ये सारेगम लिटील चॅम्प या कार्यक्रमाने तिला ओळख निर्माण करुन दिली. या कार्यक्रमातुन ओळख निर्माण झाल्यांनतर तिने अनेक ठिकणी गायनाला सुरुवात केली. यादरम्यान तिने अनेक चित्रपट आणि मालिकासाठी गायन केले.
यादरम्यान २०१७ मध्ये आर्याने सतिश राजवाडे दिग्दर्शीत ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटाद्वारे अभिनयात पदार्पण केले. या चित्रपटात तिची तन्वीची भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर उचलुन धरली. गायनासोबत अभिनयातही अर्या अंबेकरने वेगळा ठसा उमटवला. झी मराठी वरील सध्या सुरु असलेल्या ‘माझा होशील ना’ या कार्यक्रमाचे शिर्षक गीत गायले आहे. तर झी मराठीवरील आगामी सारेगम लिटील चॅम्प कार्यक्रमात ती ज्युरीची भूमिका पार पाडणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- सिद्धार्थ-मितीलीच्या घराबाहेर अनोख्या पाहुण्यांचे आगमन…
- एकटा संभाजी काय करणार ?, त्याच्या मागे 48 खासदारांनी दिल्लीत ताकद लावावी – शाहू महाराज
- ‘डिस्को डान्सर’ मिथुन चक्रवर्ती यांचे ७१व्या वर्षात पदार्पण
- मोठी बातमी : मूक आंदोलनातील लोकप्रतिनिधींच्या भाषणबाजीवर मराठा क्रांती मोर्चा नाराज !
- कोरोना नियमांवरून राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातच मंत्री शिंगणेंकडून कार्यकर्त्यांना कानपिचक्या

