मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. त्याचा चाहता वर्ग देखील खूप आहे. नुकतेच त्याने मिताली मयेकर सोबत लग्नगाठ बांधली. मात्र सध्या यांची एका वेगळ्याच कारणामुळे चर्चा रंगली आहे. सिद्धार्थच्या मुंबईच्या गोरगावमधील खिडकीबाहेर त्याला विविध प्राण्यांचे दर्शन झाले असल्याचे त्याने स्वतः सांगितले आहे.
https://www.instagram.com/p/CQIxTu_njcu/?utm_source=ig_embed&ig_rid=aa523df0-e111-4b63-bebc-d43e4dc96371
सिद्धार्थने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर बिबट्याचा फोटो पोस्ट करत माहिती दिली. या पोस्टला त्याने सुंदर कॅप्शनही दिलं आहे. पोस्टमध्ये लिहिले की, ‘आमच्या बिल्डिंगच्या मागे आज एक पाहुणा आला होता. बराच वेळ आमच्याकडे टक लावून बघत बसला आणि झुडपात निघून गेला. त्याच्या चेहऱ्यावर एक जखम दिसली. “तुमच्यामुळे झालंय हे” असं नजरेतून सांगत होता. बिल्डिंग मधले सगळे फोटो काढायला खिडकीत आले. मी पण आलो. तो फक्त स्थिर नजरेनं बघत होता आमच्याकडे… त्याचा नजरेतून कळत होतं स्पष्ट की पाहुणा तो नाही, आम्ही आहोत. हे त्याचं घर आहे.’
https://www.instagram.com/p/CQJalRInFlD/?utm_source=ig_embed&ig_rid=91e0d380-c7cc-4e21-9c27-eef4703d2e1e
त्यानंतर सिद्धार्थला एक सरडाही झाडावर दिसला. त्याचाही फोटो त्याने पोस्ट केला आहे. या फोटोला कॅप्शन देत त्याने लिहिलं आहे, ‘फोटोग्राफी कौशल्य चांगलं झालं आता. तो एक चांगला पोझर होता. धन्यवाद सरड्या.’ असे विनोदी अंदाजात त्याने लिहिले आहे.
https://www.instagram.com/p/CQJBKSmn_qo/?utm_source=ig_embed&ig_rid=ca143892-1353-4322-a803-0a66ed31ef7d
नंतर त्याला सांबर दिसलं आणि त्याचाही सुंदर फोटो त्याने पोस्ट केला. या पोस्टमध्ये त्याने लिहिलं आहे, ‘पिंजऱ्यात मी होतो. अडकलेलो. तो मोकळा फिरत होता सगळीकडे……अजून एक..’ सिद्धार्थच्या या पोस्ट्सवर कमेंट्स केल्या आहेत. तर त्याच्या या पोस्ट्ससाठी त्याचे कौतुकही केलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- एकटा संभाजी काय करणार ?, त्याच्या मागे 48 खासदारांनी दिल्लीत ताकद लावावी – शाहू महाराज
- ‘डिस्को डान्सर’ मिथुन चक्रवर्ती यांचे ७१व्या वर्षात पदार्पण
- मोठी बातमी : मूक आंदोलनातील लोकप्रतिनिधींच्या भाषणबाजीवर मराठा क्रांती मोर्चा नाराज !
- कोरोना नियमांवरून राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातच मंत्री शिंगणेंकडून कार्यकर्त्यांना कानपिचक्या
- याहीवर्षी राज्यभरात भरणार मोबाईलमध्येच शाळा

