🕒 1 min read
कोल्हापूर : जिल्ह्यातील जयसिंगपूर येथे वीसावी ऊस परिषद होणार आहे. राजू शेट्टी ऊसदर, एकरकमी एफआरपी आणि अतिवृष्टी व पूरग्रस्तांच्या मदतीवर काय भूमिका मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस दराच्या आंदोलानाचं रणशिंग जयसिंगपूरच्या ऊस परिषदेतून फुंकलं जातं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि ऊस उत्पादक शेतकरी या परिषदेची आतुरतेनं वाट पाहत असतात. राजू शेट्टी ऊस परिषदेत जी भूमिका मांडतील त्याआधारे स्वाभिमानीकडून आंदोलनाची पुढील दिशा ठरते. यंदा पहिल्यांदाच गाळप हंगामाआधी साखरेचे दर वाढल्याने ऊस दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक पावित्रा घेण्याचे संकेत आहेत.
तसेच जुलै महिन्यात कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका बसला होता. दोन्ही जिल्ह्यातील नदीकाठच्या जमिनींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली मदत तटपुंजी असल्याने राजू शेट्टी यांनी पंचगंगा परिक्रमा आंदोलन केलं होतं. त्यानंतर राज्य सरकारनं जाहीर केलेल्या मदतीवरुनही राजू शेट्टींनी आक्रमक भूमिका घेतली. या परिषदेतही स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक पवित्रा घेणार असल्याचे सांगितले जाते.
महत्वाच्या बातम्या
- कमी प्रतिच्या गांजामुळेच विरोधकांची बेताल बडबड – संजय राऊत
- ‘ठाकरे-पवार सरकार म्हणजे ‘अलीबाबा चाळीस चोरा’चे घोटाळेबाज सरकार’, किरीट सोमय्यांचे टीकास्त्र
- ‘ज्या पवारांच्या तोंडाला काळं फासण्याची भाषा करत होते आज त्यांच्याच कौतुकाचा तुणतुणा वाजवण्याची वेळ शिवसेनेवर आली आहे
- जातीयवादी टिप्पणी प्रकरणी युवराज सिंगला अटक आणि जामीनही…
- ‘पडद्यामागची वसुली चव्हाट्यावर आणली म्हणून इतका थयथयाट बरा नव्हे’, केशव उपाध्येंचा प्रतिटोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
