कोल्हापूर – पूरग्रस्तांच्या विविध मागण्यासाठी आक्रोश मोर्चा काढल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आजपासून जलसमाधी परिक्रमा यात्रेस सुरुवात केली आहे. कोल्हापूर नजीक असलेल्या प्रयाग चिखली येथून सकाळी या यात्रेला माजी खासदार राजू शेट्टी यांच्या पुढाकाराने सुरुवात झाली.
कोल्हापूर सांगली सातारा जिल्ह्यामध्ये जुलै मध्ये महापूर आला. यामध्ये शेती,घरे, दुकाने यांची अतोनात हानी झाली. मात्र २०१९ सालच्या तुलनेत यावर्षी अत्यंत तोकडी मदत केली असल्याने राजू शेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे. तेंव्हाप्रमाणे यावर्षी शासनाने मदत करावी, अशी मागणी करत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांचावर टीकास्त्र सोडले आहे.
महापुरात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. हे निकष बदलावे आणि तातडीने शेतकऱ्यांना भरीव मदत करावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांनी गेल्या आठवड्यात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. पूरग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चावेळी राजू शेट्टी यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली होती.
“राज्य सरकारने पूरग्रस्त मदतीचा निर्णय नाही बदलला तर चिखलीतून नरसोबावाडीच्या दिशेने जाऊन जलसमाधी घेणार आहे. जगण्यात काही अर्थ राहिला नाही, तोडगा नाही निघाला तर सामूहिक जलसमाधी नक्की आहे,” असा इशारा शेट्टी यांनी दिला होता. दरम्यान, आंबेवाडी, वडणगे, निगवे, भुये, शिये, शिरोली, हालोंडी, हेर्ले, चोकाक, रूकडी, चिंचवाड, पट्टणकोडोली, रूई, इंगळी, चंदूर, शिरदवाड, हेरवाड, तेरवाड, कुरूंदवाडमार्गे नृसिंहवाडीत जलसमाधी घेऊन आंदोलन समाप्त होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘अण्णा हजारे इतके दिवस कुठे होते?’, मंदिराच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंचा सवाल
- ‘नाक्यावर संजय राऊत सारखे माणसे पैसे देऊन विकत घेता येतात’, नितेश राणेंचा टोला
- ‘भास्कर जाधवच्या मुलाने मंदिरात अभिषेक केलेला चालतो, पण सामान्यांसाठी मंदिरे बंद’
- ‘तुमची बाहेर पडायला फाटते त्यात आमचा काय दोष’ ; उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला
- गांधी परिवाराची बदनामी करणारा व्हिडिओ केल्याप्रकरणी पायल रोहतगी विरोधात पुण्यात गुन्हा दाखल

