जालना: काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील भोकरदन येथील स्टेट बँक ऑफ इंडिया मधील कर्मचाऱ्याने एका शेतकऱ्याला शिवीगाळ करत मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलं होता. शेतकरी पीक कर्ज काढण्यासाठी तिथे गेला असतं त्याला शिवीगाळ करण्यात आली व त्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली, या सर्व प्रकारामुळे सर्वत्र या कृत्याचा निषेध व्यक्त केला जातोय तसेच आता स्वाभिमानी शेतकरी संघटना देखील आक्रमक झाली असल्याचे दिसत आहे.
बँकेत गेलेल्या शेतकऱ्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण करणाऱ्या बँक कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करुन त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे,अशा निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांनी दिले आहे.निवेदनात म्हटले, पिककर्ज काढण्यासाठी शेतकरी उभा असताना शिपायाने बँकेचे गेट बंद केलं आणि आता वेळ संपली उद्या या असं सांगितले. यावरून या शेतकऱ्याने मॅनेजरकडे पीककर्जाची फाईल निकाली काढा अशी मागणी केली असताना मॅनेजरने या शेतकऱ्याला तुझ्या बापाचा नोकर नाही, असं म्हणत शिवीगाळ केली.
यावेळी शिपाई आणि बँकेतील क्षेत्र अधिकाऱ्यांनी देखील या शेतकऱ्याला बेदम मारहाण केली. बँकेच्या शाखेत दलालांचे मोठे रॅकेट सक्रिय आहे. दलालांच्या माध्यमातून कोणतेही कर्ज प्रकरण लवकर होते तर जे शेतकरी दलालांकडे कर्ज प्रकरण देत नाहीत. कित्येक महिने बँकेच्या खेट्या माराव्या लागतात. या बँकेतील क्षेत्र अधिकारी इम्रान पठाण यांची याविषयी विभागीय चौकशी करण्यात यावी. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना या शेतकऱ्यास न्याय दिल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, असा इशारा काळे यांनी दिला आहे.
महत्वाच्या बातम्या
- डब्ल्युटीसी फायनल! तिसऱ्या दिवशी न्युझीलंड २ बाद १०१
- ‘जडेजा-अश्विनची जोडी टीम इंडियासाठी ठरणार गेम चेंजर’ ; दिग्गज खेळाडूचा दावा
- ….त्या दिवशी क्रिकेट सोडून देईन, निवृत्तीवर अश्विनचे मोठे विधान
- दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत वेस्ट इंडिजसमोर विजयासाठी ३०९ धावांचे लक्ष्य
- …अन् विराट कोहली मैदानात करू लागला भांगडा , पाहा भन्नाट व्हिडीओ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

