Share

पुणेकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; महापौर परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी पुण्याच्या महापौरांची निवड

Published On: 

पुणे : पुणे शहरात कोरोनाच्या पहिल्या लाटेसह दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला होता. पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या ही मधल्या काळात संपूर्ण देशात सर्वाधिक होती. पुणे महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील कोरोना स्थिती ही आता आटोक्यात आली असून आता कोरोना काळातील कामांसह शहरातील इतर कामांमुळे पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची अखिल भारतीय महापौर परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. याबाबत त्यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.

‘अखिल भारतीय महापौर परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी माझी निवड करण्यात आली असून या निवडीचे पत्र नुकतेच परिषदेकडून प्राप्त झाले आहे. राष्ट्रीय स्तरावरील ही महापौरांची परिषद असून परिषदेचे अध्यक्ष आणि आग्र्याचे महापौर नवीन जैन यांनी निवडीचे पत्र दिले. माझी निवड झाली असली, तरी पुणे शहराला हा बहुमान मिळाला, याचा मनस्वी आनंद आहे. आपल्या कामाची आणि पदाला न्याय देण्याची दखल घेतली जाते. हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला समाधान देणारे आहे. हे राष्ट्रीय पातळीवर हे पद म्हणजे केवळ माझाच नाही तर तमाम पुणेकरांचा सन्मान आहे,’ असं मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे.

यासोबतच, ‘या पदामुळे काम करण्याचा उत्साह तर आणखी वाढेलच, शिवाय जबाबदारीची जाणीवही आणखी घट्ट होत आहे. महापौरपदाची जबाबदारी भारतीय जनता पक्षाने माझ्याकडे दिल्यानंतर पदाला न्याय देण्याचा, झोकून आणि प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला आहे. आगामी काळातही अशीच वाटचाल सुरु राहील,’ अशी ग्वाही त्यांनी दिली. तसेच, ‘पुणे शहराला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढण्यासोबतच शहराच्या शाश्वत विकासावर याचा कोणताही परिणाम होऊ दिला नाही. हे शिवधनुष्य आगामी काळातही पेलू. संपूर्ण कारकिर्दीत पुणेकरांची लाभलेली साथ आणि आमच्यावर दाखवलेला विश्वास हाही या टप्प्यातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे,’ असं म्हणत पुणेकरांचे देखील मोहोळ यांनी आभार मानले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!