Share

सीरमच्या आगीमागे घातपाताची शंका; मुक्ता टिळक यांच्याकडून संशय व्यक्त

Published On: 

पुणे:- अवघ्या जगावर गेल्या वर्षभरापासून कोरोनाचं सावट आलं आहे. या रोगावर लस बनवण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञांनी आटापिटा केला. सुमारे ८ महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर जगभरात शास्त्रज्ञांना यश आलं. देशातील सिरम इन्स्टिट्यूटने पहिली लसीचा मान मिळवल्यानंतर या कंपनीचे जगभरात कौतुक केले गेले.

मात्र, एक धक्कादायक वृत्त समोर येत असून पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये मोठ्या प्रमाणात आग लागली आहे. पुण्यातील मांजरी परिसरातील सिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन बिल्डिंगला आग लागल्याने परिसरात धुराचे लोट पसरले आहेत. या नवीन इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, सुदैवाने कोरोनावरील कोव्हिशिल्ड लस बनवण्याचं काम दुसऱ्या इमारतीत सुरु आहे. त्यामुळे कोरोना लस सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. दुपारी दीड ते दोनच्या सुमारास ही आग लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनी व्यक्त केलेली शंका ही अत्यंत धक्कादायक आहे. आमदार मुक्ता टिळक यांनी या आगीमागे घातपाताची शंका आहे का असा प्रश्न विचारुन, तशी शंका व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!