मुंबई:- सांगली: गेली 20 वर्ष राजकारणात सक्रिय आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणे हे नक्कीच ‘दिवास्वप्न’ नाही, तर राजकारणातील शक्तीने हे स्वप्न हस्तगत करणं हेच आपलं उद्दिष्ट आहे, असं जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. जयंत पाटलांच्या या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून अनेक तर्कवितर्क व्यक्त केले जात आहेत.
इस्लामपूर येथे एका कार्यक्रमासाठी जयंत पाटील आले होते. यावेळी त्यांनी एका स्थानिक चॅनेलशी बोलताना मुख्यमंत्रीपदाबाबतचं आपलं स्वप्न उघड केलं. मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न साकार करण्यासाठी पक्ष बांधणी आणि आमदारांचं संख्याबळ वाढवणे यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील, असं पाटील म्हणाले.
दरम्यान, जयंत पाटील यांचे मुख्यमंत्रीपदाबाबतचे वक्तव्य सर्वत्र प्रसारित झाल्यानंतर ह्यावर स्वतः जयंत पाटील यांनी एक फेसबुक पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. ‘इस्लामपूर येथील एका स्थानिक माध्यमाला मी दिलेल्या मुलाखतीचे जसेच्या तसे वार्तांकन लोकमत मध्ये आलेले असून, माझ्या विधानाची मोडतोड करून दिशाभूल करणारे वार्तांकन प्रसारमाध्यमांनी करू नये हि विनंती’, असं जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
https://www.facebook.com/JayantRPatilofficial/posts/2158836164247012
महत्वाच्या बातम्या
- उदयनराजे भोसले यांच्या कार्यकर्त्यांकडून ‘त्या’ उड्डाणपुलाचं नामकरण
- ‘मै तेरा नोबिता, तू मेरी शिजुका’ अखेर शिजुका झाली नोबिताची
- शिवसेनेचे वाघ पोहचले बेळगाव सीमेवर, बंदोबस्त तोडून भगवा फडकवण्यावर ठाम !
- ‘बंजारा समाजाबद्दल वादग्रस्त लिखाण करणाऱ्या लेखक भालचंद्र नेमाडे यांना अटक करा’
- “मी आणि संघ खूप आनंदी आहोत”, मायदेशी परतलेल्या पंतची पहिली प्रतिक्रिया


