Share

Skin Care Tips | त्वचेवरील चमक वाढवायची असेल तर, चेहरा धुतल्यानंतर वापरा ‘या’ गोष्टी

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: आपल्या सर्वांना सुंदर (Beautiful), चमकदार (Glowing) आणि डागमुक्त त्वचा (Skin) हवी असते. त्यामुळे पुरुष असो किंवा महिला प्रत्येकजण आपल्या चेहऱ्याची विशेष काळजी घेत असतो. चेहऱ्याला आकर्षक बनवण्यासाठी लोक अनेकदा त्यावर हळद, बेसन, कोरफड, लिंबाचा रस इत्यादी गोष्टींचा वापर करतात. त्यानंतर चेहरा धुतात. पण तुम्हाला माहित आहे का? चेहरा चमकदार बनवण्यासाठी चेहरा धुतल्यानंतरही त्यावर अनेक गोष्टी लावणे महत्त्वाचे असते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, चेहरा धुतल्यानंतर काय लावावे? त्याबद्दल आम्ही आज तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून माहिती सांगणार आहोत.

मॉइश्चरायझर

चेहरा धुतल्यानंतर त्याला मॉइश्चरायझ करणे खूप आवश्यक असते. कारण चेहरा धुतल्याने त्वचेवरील नैसर्गिक तेल निघून जाते. त्यामुळे त्वचेला ओलावा देण्यासाठी मॉइश्चरायझर लावणे खूप गरजेचे असते. त्याचबरोबर नियमित मॉइश्चरायझर उपयोग केल्याने कोरडी आणि खडबडीत त्वचा देखील नाहीशी होते. तुमचा चेहरा जर अधिक तेलकट असेल तर तुम्ही क्रीमयुक्त मॉइश्चरायझर लावणे टाळले पाहिजे.

टोनर

चेहरा धुतल्यानंतर त्याला चमकदार बनवण्यासाठी तुम्ही त्यावर टोनर लावू शकतात. त्याचबरोबर तुम्ही हायड्रेटिंग टोनर देखील वापरू शकता. टोनर चा नियमित चेहरा धुतल्यावर वापर केल्यास त्वचा हायड्रेट राहते आणि त्वचेवरील चमक कायम राहते.

सिरम

चेहरा धुतल्यानंतर त्यावर तुम्ही सिरम देखील लावू शकता. सिरम निवडताना त्वचेची गरज ओळखून निवडा. त्याच्या नियमित वापराने चेहऱ्यावरील डाग, पिगमेंटेशन इत्यादी समस्या देखील दूर होऊ शकतात.

सनस्क्रीन

सनस्क्रीन प्रामुख्याने उन्हाळ्यात वापरली जाते. पण तसे नसून कोणत्याही ऋतूमध्ये चेहरा धुतल्यानंतर त्यावर सनस्क्रीन लावणे आवश्यक असते. कारण सनस्क्रीन सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे रक्षण करते.

टीप : वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Health

Join WhatsApp

Join Now

🕘 संबंधित बातम्या