🕒 1 min read
Sushma Andhare | कोल्हापूर : शिंदे गटाच्या बंडांनंतर त्यांच्यावर ठाकरे गटाकडून गद्दार म्हणत आरोप केले जात आहेत. यावर आम्ही हिंदुत्वासाठी भाजपसोबत आलो असल्याचं स्पष्टीकरण शिंदे गटाकडून देण्यात येतंय. या मुद्द्यावरून शिवसेनेच्या फायरब्रॅन्ड नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी कोल्हापुरमध्ये महाप्रबोधन यात्रेत शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केलाय.
त्या म्हणाल्या, “डोळ्याला पाणी लाऊन म..म म्हणणारे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. डोळ्यातले पाणी पुसणारे हिंदुत्व आम्हाला हवं आहे, जे बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलं आहे. कुटुंब संकटात असताना पळून जाणारे आणि स्वार्थ साधणारे लोक, ते हिंदुत्वाची व्याख्या करत असतील तर ती मान्य नाही.”
यावेळी बोलताना सुषमा अंधारे यांनी दीपक केसरकरांनाही लक्ष केलं. “बाळासाहेब ठाकरे यांचं 2012 साली निधन झालं. त्यानंतर दोन वर्षांनी दीपक केसरकर (Deepak Kesarkar) 2014 ला शिवसेनेत आले. केसरकर सातत्याने बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर भाष्य करतात. पण मग ते हे हिंदुत्व शिकले कधी?”,असा सवाल सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी विचारला आहे.
दरम्यान, यावेळी चंद्रशेखर बावनकुळेंनी केलेल्या विधानावर सुषमा अंधारेंनी भाजपावर टीका केली. “जर आम्हाला उमेदवार मिळणार नसेल, तर तुम्ही काळजी नाही, आनंद व्यक्त केला पाहिजे. पेढे वाटले पाहिजेत. चांगली गोष्ट आहे ना. पण तुमची लेकरं उघडीपाघडी रस्त्यावर फिरतायत, त्यांच्याकडे तुम्ही बघत नाहीयेत. आमचीच लेकरं घेऊन तुम्ही त्यांना आंगडं-टोपडं, काजळ-पावडर करताय ते बंद करा”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या :
- Travel Guide | गुलाबी थंडीमध्ये उबदारपणा अनुभवायचा असेल, तर ‘या’ ठिकाणांना द्या भेट
- Prakash Ambedkar | “ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी युती करणार?”; प्रकाश आंबेडकर म्हणाले,
- Congress | भारत जोडो यात्रेमध्ये भाजपकडून अडथळे ; काँग्रेसचा आरोप
- Periods Hack | मासिक पाळी दरम्यान सॅनिटरी पॅड्सशिवाय महिला वापरू शकतात ‘हे’ हायजिनिक पर्याय
- Gajanan Kirtikar | शिंदे गटात गेल्यावरही स्वत:ला निष्ठावंत कसं म्हणता?, प्रश्न विचारताच गजानन कीर्तिकर भडकले, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
