🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: मासिक पाळी (Periods) ही स्त्रियांमध्ये होणारी एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. नियमित मासिक पाळी येण्याचा अर्थ असा होतो की स्त्रियांच्या शरीराने गर्भधारणेची क्षमता मिळवण्याची पहिली पायरी ओलांडली आहे. त्याचबरोबर मासिक पाळीची सुरुवात होणे म्हणजे लैंगिक अवस्थेची सुरुवात होणे होय. महिलांना दर महिन्याला मासिक पाळीला सामोरे जावे लागते. मासिक पाळी दरम्यान महिला विविध प्रकारचे सॅनिटरी पॅड्स (Sanitary Pad) वापरत असतात. पण अनेकदा या सॅनिटरी पॅडमुळे महिलांना इन्फेक्शनला सामोरे जावे लागते. त्याचबरोबर आजच्या धावपळीच्या युगामध्ये नियमितपणे सॅनिटरी पॅड बदलणे थोडेसे अवघड जाते. त्यामुळे तुम्ही सॅनिटरी पॅड सोडून इतर अनेक पर्याय वापरू शकतात. हे पर्याय जास्त सोयीस्कर आणि जास्त स्वच्छतेचे आहेत. त्याबद्दल आम्ही आज तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून माहिती सांगणार आहोत.
टॅम्पन्स
मासिक पाळी दरम्यान महिला सॅनिटरी पॅड शिवाय टॅम्पन्सचा वापर करू शकतात. टॅम्पन्स स्वच्छता राखण्यास मदत करते. त्याचबरोबर ते इतके आरामदायी असते की, मासिक पाळी दरम्यान होणारी खाज आणि पुरळ या समस्येपासून महिला मुक्त होऊ शकतात. त्याचबरोबर टॅम्पन्सना पॅड सारखे बदलावे लागत नाही. त्यामुळे टॅम्पन्सचा वापर अधिक फायदेशीर होऊ शकतो.
मेंस्ट्रूअल कप
मेंस्ट्रूअल कप हा टॅम्पन्स सारखाच असतो. सॅनिटरी पॅड आणि टॅम्पन्सच्या तुलनेत मेंस्ट्रूअल कप जास्त रक्त गोळा करतो. त्याचबरोबर या दोघांच्या तुलनेमध्ये मेंस्ट्रूअल कप अधिक आरामदायी असतो. त्याचबरोबर मेंस्ट्रूअल कप पुन्हा पुन्हा बदलण्याची गरज नसते. आणि विशेष म्हणजे तुम्ही हा एकदा वापरून, धुवून त्याला पुन्हा वापरू शकता.
क्लॉथ पॅड
क्लॉथ पॅड हे दिसायला सॅनिटरी पॅड सारखेच दिसतात आणि त्यांच्या सारखेच वापरले जातात. या दोघांमध्ये फरक असा आहे की सॅनिटरी पॅड मध्ये कापूस वापरला जातो आणि क्लॉथ पॅडमध्ये कापड वापरले जाते. क्लॉथ पॅडचा तुम्ही एकदा वापरल्यावर धुवून पुन्हा वापर करू शकता. त्याचबरोबर ते इको फ्रेंडली असतात.
मेंस्ट्रूअल डिस्क
मेंस्ट्रूअल डिस्क बद्दल अधिक लोकांना माहीत नाही. टॅम्पन्स आणि मेंस्ट्रूअल कप प्रमाणे मेंस्ट्रूअल डिस्क देखील योनीमध्ये घातली जाते. त्याचबरोबर हे बारा तासापर्यंत वापरले जाऊ शकते.
टीप : वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञाचा सल्ला घ्यावा.
महत्वाच्या बातम्या
- Gajanan Kirtikar | शिंदे गटात गेल्यावरही स्वत:ला निष्ठावंत कसं म्हणता?, प्रश्न विचारताच गजानन कीर्तिकर भडकले, म्हणाले…
- Chhagan Bhujbal | “नुसतं कुणाला हात लावून बाजूला करणे विनयभंग होत असेल तर…” ; छगन भुजबळ यांचे मोठे विधान
- Sushma Andhare | “2012 ला बाळासाहेबांचं निधन, केसरकर 2014 ला शिवसेनेत आले, मग बाळासाहेबांचं हिंदुत्व कधी शिकले?”
- Electric Car Launch | देशातील सर्वात स्वस्त आणि लहान इलेक्ट्रिक कार झाली लाँच
- Eknath Shinde | एकनाथ शिंदे अन् प्रकाश आंबेडकरांच्या भेटीनंतर शिंदेंची प्रतिक्रिया, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
