औरंगाबाद : शहराच्या नवीन जलयोजनेच्या कामाने मागील महिन्यात गती पकडली आहे. दरम्यानच्या काळात कंत्राटदार जीबीपीआर कंपनीने जायकवाडी ते नक्षत्रवाडी या चाळीस किमी. अंतराच्या मुख्य जलवाहिनीच्या कामाचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. सोबतच शहरातील १९०० किमी.पैकी ७०० किमी.च्या अंतर्गत जलवाहिन्यांच्या कामाचेही सर्वेक्षण केले आहे. योजनेतील जलशुद्धीकरण केंद्र व सहा जलकुंभांच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात करण्यात आली आहे.
वादग्रस्त समांतर जलवाहिनी योजना गुंडाळल्यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये राज्य सरकारने औरंगाबाद शहरासाठी १६८० कोटी रुपयांची नवीन जलयोजना मंजूर केली. त्यानंतर केवळ निविदा प्रक्रियेलाच वर्षभराचा अवधी लागला.
अखेर १२ डिसेंबर २०२० रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते जलयोजनेच्या कामाचे भूमिपूजन झाले. त्यानंतरही जीबीपीआर कंपनीने सिमेंट आणि स्टीलच्या किंमतीत वाढ झाल्याचे कारण देत निविदा दरापेक्षा तीनशे कोटी रुपये वाढवून देण्याची मागणी केली होती.
त्यामुळे योजनेचे काम रेंगाळत पडले होते. दरम्यान, यात सरकारने कंपनीला निविदेतील अटी शर्थींची आठवण करुन देत ठरल्याप्रमाणे काम करा, नसता निविदा रद्द करु, असा इशारा दिला. त्यानंतर कंपनीने योजनेच्या कामाला लगेच सुरूवात केली. याबाबतच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणमधील सूत्रांनी माहिती दिली की, जीबीपीआर कंपनीने महिनाभरापासून कामाला सुरूवात केली आहे.
पहिल्या टप्प्यात अचूक लेव्हल घेण्यासाठी सर्वेक्षण करणे गरजेचे होते. त्यानुसार कंपनीने जायकवाडी ते नक्षत्रवाडी पर्यंतच्या मुख्य जलवाहिनीचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे.
त्या रस्त्यांवर आधीच टाकणार पाईप
जलयोजनेअंतर्गत शहरात १९०० किमी लांबीच्या अंतर्गत जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत. मात्र १५२ कोटींच्या शासन निधीतील रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यावर जलवाहिन्या टाकायच्या झाल्यास रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करावी लागणार आहे. त्यामुळे ही तोडफोड टाळण्यासाठी कंपनीने तातडीने ६० किमी.च्या पाईपची ऑर्डर दिली आहे. सध्या जिथे रस्त्यांची कामे सुरू आहेत, तिथे हे पाईप टाकून घेतले जाणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- डीसीसी निवडणूक! मंत्री भुमरे यांना सोलाटे यांचे आव्हान
- चिंताजनक! कोरोनाबाधितांमध्ये लहान मुलांचे प्रमाण वाढले
- बीड डीसीसी निवडणूक; मातब्बर रिंगणात उतरल्याने चुरस वाढली
- ‘कंदहार विमान अपहरण प्रकरणात ममतादीदी बंधक होण्यास तयार होत्या’
- एक बार जो मैंने…म्हणत सलमानने जाहीर केली राधेची रिलीज डेट
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

