🕒 1 min read
कोलकाता : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांचे वेध लागल्या पासूनच देशातील राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्ष विरुद्ध ममता बॅनर्जी अशी मुख्य लढत पाहायला मिळणार आहे.
आता, माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मोठा गौप्यस्फोट केला आहे. ‘कंदहार अपहरण प्रकरणात ममता बॅनर्जी स्वत:ची कुर्बानी द्यायला तयार होत्या. प्रवाशांची सुटका होत असेल तर मला अतिरेक्यांकडे ओलीस म्हणून पाठवा, असा प्रस्तावच ममता यांनी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यासमोर ठेवला होता,’ असा दावा वाजपेयी सरकारमधील मंत्री यशवंत सिन्हा यांनी केला आहे.
‘इंडियन एअरलाईन्सचं विमान अपहरण करुन कंदहारमध्ये नेण्यात आलं होतं. या विषयावर कॅबिनेटमध्ये चर्चा सुरू होती. त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी स्वत:ला अतिरेक्यांच्या ताब्यात देण्याची तयारी दाखवली होती. अतिरेक्यांनी सर्व प्रवाशांची सुटका करावी, त्याबदल्यात ममतांची अतिरेक्यांच्या ताब्यात जाण्याची आणि त्यानंतरच्या सर्व परिणांमांना सामोरे जाण्याची तयारी होती, अशी अट अतिरेक्यांना घालण्यासही त्यांनी सांगितलं होतं.’ असा गौप्यस्फोट यशवंत सिन्हा यांनी केला आहे.
दरम्यान, ‘देशासाठी जी काही कुर्बानी देता येईल ती द्यायला मी तयार आहे, असंही ममतादीदींनी सांगितलं होतं,’ असा दावा कोलकात्यात टीएमसीचे सदस्यत्व स्वीकारल्यानंतर मीडियाशी बोलताना यशवंत सिन्हा यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- नितीन राऊत एकतर्फी निर्णय घेतात; नागपुरात लॉकडाऊनवरून काँग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने
- ‘लॉकडाऊन बाबत मुख्यमंत्री मंगळवारी संबोधित करणार’
- २ मंत्र्यांच्या भांडणात सर्वसामान्यांचा जीव जातोय; वीजबिल वसुलीवरून राजू शेट्टी भडकले
- मोदींना कडाडून विरोध करणारे यशवंत सिन्हा राजकारणात पुन्हा सक्रीय का झाले ?
- ” ‘ते’ पाऊल उचलण्याआधी डेलकरांनी मोदी-शाहांना पत्र लिहिलं होतं, मात्र…”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

