Share

एक बार जो मैंने…म्हणत सलमानने जाहीर केली राधेची रिलीज डेट

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खानचा बहूचर्चीत ‘राधे’ या चित्रपटाची रिलीज डेट सलमानने आज जाहीर केली. १३ मे रोजी ‘राधे’ हा चित्रपट रिलीज होणार आहे. २ महिने आधी म्हणजे १३ मार्च रोजी सलमानने आपल्या चित्रपटाच्या रिलीज डेटची घोषणा केली.

अभिनेता सलमान आणि ईद हे समीकरण बॉलीवूडमध्ये सगळ्यांनाच माहित आहे. ईद म्हणजे सलमानचा चित्रपट रिलीज होतोच. यंदाच्या ईदला सलमानचा राधे प्रदर्शित होणार आहे. सलमानने, ‘ईद का कमीटमेंट था. ईद पर ही आयेंगे, क्यूं के एक बार जो मैने…’ अशी पोस्ट करत राधे या चित्रपटाचे पोस्टर शेअर केले. ‘राधे’ या सलमान खानच्या चित्रपटाची त्याचे चाहते गेल्या कित्येक महिन्यांपासून वाट पाहात आहेत.

https://www.instagram.com/p/CMWVHwClTow/

‘राधे’ सलमान खानच्या मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे. कोरोनामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण रखडले होते. कोरोना प्रादुर्भाव ओसऱल्यानंतर सलमानने शूटिंगला पुन्हा सुरुवात केली होती. आता हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रभुदेवा करतोय. सलमान यात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत दिशा पाटनी, रणदीप हुड्डा हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!