टीम महाराष्ट्र देशा;- विविध हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या चातगाव दलमच्या कमांडरसह ७ नक्षलवाद्यांनी बुधवारी सायंकाळी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे.त्यात ३ महिलांचांही समावेश आहे. त्या सर्वांवर एकूण ३३ लाख ५० हजार रुपयांचे बक्षीस होते. एखाद्या दलममधील सर्व सदस्यांनी आत्मसमर्पण केल्याची ही पहिलीच घटना आहे. या सर्वांनी गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकावडे यांच्या समोर आत्मसमर्पण केले .
दरम्यान, आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची नावे राकेश उर्फ गणेश सनकू आचला (३४), देवीदास उर्फ मनिराम सोनू आवला (२५), रेश्मा उर्फ जाई दुलसू कोवाची (१९), अखिला उर्फ राधे झुरे (२७), शिवा विज्या पोटावी (२२), करुणा उर्फ कुम्मे रामसिंग मडावी (२२), राहुल उर्फ दामजी सोमजी पल्लो (२५) अशी नावे आहेत.
दरम्यान, गडचिरोली पोलीस दलानं आतिशय प्रभावीपणे राबवलेल्या नक्षलविरोधी अभियानात या वर्षी कालअखेर एकंदर ऐकून २३ नक्षलवादी शरण आले आहेत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182207087599738881?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182210456728915968?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

