पटणा : बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यात सोमवारी रात्री नक्षलवाद्यांनी एका मोबाईल टॉवरसह पंचायत इमारत स्फोटकांनी उडवल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर सीआरपीएफसह मोठ्या प्रमाणावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
घटना मदनपूरच्या जुदाही भागात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील अत्यंत नक्षलग्रस्त मदनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जुडाही येथे आलेल्या एका नक्षलवाद्यांच्या टोळीने मोबाईल टॉवरसह पंचायतीची इमारत उडवली.
दरम्यान, नक्षलवादी संघटना सीपीआय-माओवाद्यांनी २३ ते २५ नोव्हेंबर दरम्यान झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड या चार राज्यांमध्ये बंद ची हाक दिली आहे. माओवादी नेता प्रशांत घोष उर्फ किशन दा आणि त्याची पत्नी शीला मरांडी यांच्या अटकेच्या निषेधार्थ त्यांनी बंद पुकारला आहे. नक्षलवाद्यांनी पुकारलेल्या बंददरम्यान या सर्वच राज्यात पोलिसांनी गस्त वाढली आहे. सर्व महामार्गांवर पोलीस गस्त घालताना दिसून येत आहेत. याशिवाय संवेदनशील भागात अतिरिक्त फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे.
औरंगाबादचे एसपी कांतेशकुमार मिश्रा याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले, नक्षलवाद्यांनी मोबाईल टॉवर उडवल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर सुरक्षा दलाचे एक पथक पाठवण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. पण, काही लोकांचे अपहरण केल्याची माहिती तपासानंतर सांगता येईल. याची माहिती सध्या घेतली जात आहे, संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर स्पष्टपणे यावर बोलता येईल.
महत्वाच्या बातम्या
- ‘एसटी संपाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याशी चर्चा करणार’
- ‘गुजरातसारखं महाराष्ट्राला दंगलीची प्रयोगशाळा करायची का?’
- ‘शिवतीर्थ’वर सचिन तेंडुलकरने घेतली राज ठाकरेंची भेट
- विश्वासघातानं गेलेलं सरकार मेहनतीनं आणता येतं; चंद्रकांत पाटलांचा विश्वास
- मी तर एक छोटे प्यादे आहे, मोठे खेळाडू तर….; सचिन वाझेचे खळबळजनक वक्तव्य


