Share

नक्षलवाद्यांच्या प्रश्नांवर होणारी बैठक गुप्तच असते; त्यात राजकीय अर्थ काढू नका- मंत्री जयंत पाटील

Published On: 

औरंगाबाद : नक्षलवाद्यांच्या प्रश्नावर होणारी बैठक गुप्तच असते. त्यामुळे त्यात राजकीय अर्थ काढू नका, त्यात गैर काहीच नाही. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील
बैठकीबाबत दिली. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी रविवारी जिल्ह्यातील विविध योजनांचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधतांना ते बोलत होते.

वाढत्या नक्षलवादी कारवाईच्या संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महत्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीला महाराष्ट्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यातील ही बैठक बंद दाराआड होणार का? असा प्रश्न आता उपस्थित झाला होता. याबाबत जयंत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले महाविकास आघाडी भक्कम आहे. कोणताही पक्ष नाराज नाही असे ते म्हणाले.

नक्षलवाद्यांच्या प्रश्नावर होणारी बैठक गुप्तच असते. त्यामुळे त्यात राजकीय अर्थ काढू नका, असेही त्यांनी सांगितले. यापुढे सर्व निवडणुका महाविकासआघाडी तिन्ही पक्षांनी एकत्रित लढवाव्यात असा राष्ट्रवादीचा आग्रह आहे. यासाठी आता शिवसेना आणि काँग्रेसने प्रयत्न केले पाहिजेत.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक नेत्यांना देण्यात आले आहेत. त्यानुसार निर्णय घेण्यात येतील. मात्र सरकार म्हणून केलेले काम जनतेस पुढे नेण्यासाठी तिन्ह पक्ष एकत्र आल्यास फायदा होईल असे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!