Share

आश्चर्य ! देशातील पहिला कोरोना रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह

Published On: 

नवी दिल्ली : गेल्या वर्षीपासून कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. अनेक देश आता कोरोनातून सावरत असले तरी भारताला दुसऱ्या लाटेचा गंभीर परिणाम भोगावे लागले. अशातच, येत्या काही महिन्यात तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. तसेच, दुसऱ्या लाटेतून अधिक तीव्र ही लाट असेल, यामुळे आरोग्य यंत्रणांसमोर मोठं आव्हान असून देशवासीयांनी योग्य खबरदारी घेण्याचं आवाहन केलं जात आहे.

दरम्यान, कोरोना काळात वैज्ञानिकांनाही चक्रावून टाकणारे अनेक निकष समोर आले. पुन्हा असा धोका मानवजातीला बसू नये यासाठी संशोधन करून चुका टाळण्याचे प्रयत्न सुरु आहेत. लसीकरण, औषधे असे विविध पर्याय निर्माण केले जात आहेत. तर, सुरुवातीला एकदा कोरोना होऊन गेल्यानंतर दुसऱ्यांदा कोरोना होण्याचा धोका नसल्याचे म्हटले जात होते.

मात्र, भारतातील पहिल्या कोरोना रुग्णाला दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे. देशातील पहिला कोरोना रुग्ण हा केरळमध्ये आढळला होता. चीनहून भारतात परतलेली केरळमधील वैद्यकीय विद्यार्थिनी देशातील पहिली कोरोना रुग्ण ठरली होती. तिला पुन्हा कोरोनाची लागण झाल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तिची अँटीजेन टेस्ट निगेटिव्ह आली. तर, आरटी-पीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!