मुंबई – उत्तरप्रदेशमध्ये योगी सरकार ‘दोन मुलांचे’ धोरण आणत आहे. हे धोरण महाराष्ट्रात २००० मध्येच तयार करण्यात आलेले आहे. मात्र योगी आदित्यनाथ ‘दोन मुले’ हे धोरण आणून संपूर्ण देशात गोंधळ घालत आहेत त्यांनी दोन मुलांऐवजी भाजप नेत्यांच्या वक्तव्यानुसार जास्त मुलं जन्माला घालावी हे धोरण आणले पाहिजे असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपला चांगलेच चिमटे काढले. दोन मुलांच्यावर मुल झालं तर त्या व्यक्तीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका किंवा शासकीय लाभ घेता येत नाही हे महाराष्ट्रात धोरण ठरलेले आहे याची आठवणही नवाब मलिक यांनी योगींना करुन दिली.
भाजपमध्ये असे अनेक नेते आहेत त्यांची मुलं नाहीत. किंवा भाजपची मातृसंस्था आरएसएसमध्येसुध्दा असे लोक आहेत ज्यांना मुलंच नाहीत. दोन मुलं ही पॉलिसी बऱ्याच राज्यात आहे. त्यामुळे योगींनी ‘मुलं नकोत’ ही पॉलिसी अंमलात आणली पाहिजे कारण मुलं नाहीत त्यांना प्रोत्साहन मिळेल असा टोलाही नवाब मलिक यांनी लगावला.
भाजपचे साक्षी महाराज असतील किंवा त्यांच्यासारखे अनेक लोक आहेत. जे जास्त मुलं जन्माला घाला अशी सारखी – सारखी वक्तव्य करत आहेत. त्यांचं ऐकून योगीजींनी पॉलिसी निर्माण करावी असा सल्लाही नवाब मलिक यांनी दिला.
महत्त्वाच्या बातम्या
- एकनाथ खडसेंच्या जावयाच्या कोठडीत वाढ, ईडीकडून चौकशी सत्र सुरूच
- ‘दाढीवाला चोर कोण’ त्याचं नांव आशिष शेलारांनी सांगितले पाहिजे – नवाब मलिक
- ‘पंकजा तुम्ही जास्त बोलता…’ ; ‘त्या’ बैठकीत मोदींनी घेतली भाजप नेत्यांची शाळा
- नाना पटोले यांच्या विधानाची मोडतोड करून गैसरमज पसरवण्याचा प्रयत्न; कॉंग्रेसची सारवासारव
- आपण काय बोलतोय याचं भान ठेवलं पाहिजे; शिवसेनेचे पटोलेंना प्रत्युत्तर


