Share

परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी सुरेश वरपुडकर हेच उत्सूक

Published On: 

परभणी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष – उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर परभणी व हिंगोली या दोन जिल्ह्यातील नवनिर्वाचित इच्छुक संचालक, दिग्गज नेतेमंडळीनी जोरदार मोर्चेबांधणी देखील सुरू केली आहे. तर खुद्द वरपुडकर हेच अध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याची माहिती समाेर आली आहे.

काँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर तसेच माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर या दोघांच्या पॅनलला जिल्हा बँक निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. या दोघांनी स्पष्ट बहुमत मिळावे या दृष्टीकोनातून निवडणुकीतून विविध राजकीय डावपेच देखील खेळले. त्यातून एकमेकांवर कुरघोडी केल्या होत्या. परंतु दोघेही स्पष्ट बहुमत मिळवू शकले नाही. वरपुडकर गटाने सर्वाधिक संख्याबळ मिळवले आहे. तर  बोर्डीकर गट काठावरच पास झाला. अध्यक्ष- उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत या दोघा मातब्बरांना मोठ्या कसरती कराव्या लागणार, हे कळून चुकले होते.

त्यामुळेच निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना या दोघांनी निकालाबाबत, पुढील अध्यक्ष – उपाध्यक्ष पदाच्या निवडीबाबत अधिकृत  प्रतिक्रिया दिली नाही. उलट सर्व प्रक्रिया होयीपर्यंत सावध पवित्रा घेतला होता. परंतु निकाला पाठोपाठच या दोघांनी बँकेवर सत्ता मिळवण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली. वरपुडकर यांनी निकाला पाठोपाठ भाजपचे नवनिर्वाचीत संचालक बालाजी देसाई यांना विजयोत्सवात सावली सारखे ठेवले. बोर्डीकर यांनी स्वतःच्या भावाचा पराभव करणाऱ्या विटेकर यांना मतमोजणीनंतर घरी जावून भेट घेतली. त्यांचे समर्थन मिळवण्याचा प्रयत्न देखील केला.

या पार्श्‍वभूमीवर या दोघा मातब्बरांचा राजकीय खेळी, समर्थकांसह राजकीय वर्तुळात दिसल्या. अध्यक्ष – उपाध्यक्ष पदाच्या निवडी संदर्भात या दोघांनी निकालापासून आतापर्यंत भूमिका स्पष्ट केल्या नाहीत. स्वतः चे नाव देखील पुढे केले नाही.  परंतू संचालकांची चाचपणी सुरू ठेवली. हे दोघे सावध हालचाली करत होते. तेव्हा राष्ट्रवादीचे आमदार जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी यांनी मात्र, खुलेआमपणे भूमिका जाहीर केली. आम्हाला कोणीही गृहीत धरू नये, असे विधान केले. त्यांचे हे विधान दोन्ही गटांना चक्राऊन टाकणारे होते. बँक निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या प्रक्रियेपर्यंत दुर्राणी हे वरपुडकर गटाबरोबरच होते.

ऐन रणधुमाळीत ते बोर्डीकर यांच्या  गेले. प्रचारातही आघाडीवर होते. मात्र निकाल लागल्यानंतर दुर्राणी यांनी केलेल्या त्या विधानाने त्यांची महत्वकांक्षा समोर आली आहे. अध्यक्ष – उपाध्यक्षपदाची निवडणूक सोमवारी होणार आहे. परंतु दुर्राणी यांच्या त्या विधानापासून, वरपुडकर – बोर्डीकर यांच्या पडद्याआड खेळ्यांमुळे वातावरण कमालीचे तापले आहे हे मात्र नक्की.

तर बोर्डीकर हे ही अध्यक्ष-उपाध्यक्षपद आपल्या गटाकडे कसे राहिल यादृष्टीने कामात व्यस्त आहेत. परंतू अपुऱ्या संख्याबळामुळे ते बहुमताकरिता, सत्तेकरिता मोठ्या कसरती कराव्या लागणार हे त्यांना ही माहित आहे. आमदार दुर्राणी यांनी अध्यक्षपदाकरिता उत्सुकता दर्शवली होती. विशेषतः निकाला पाठोपाठ दुर्राणी यांनी बोर्डीकर यांच्या गटासमोर प्रस्ताव सुध्दा ठेवला असल्याची चर्चा आज दिवसभर होती.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!