दिल्ली : आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबाद संघाला ७ गडी राखुन पराभुत केले. हैदराबादने दिलेले १७२ धावांचे लक्ष्य चेन्नईने केवळ ३ गडी गमावक एकोणीसाव्या षटकात पुर्ण केले. चेन्नई सुपर किंग्सचा हा स्पर्धेतील सलग पाचवा विजय आहे. धडाकेबाज अर्धशतक करणाऱ्या ऋुतूराज गायकवाडला(७५) सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
सामन्याच्या दुसऱ्या डावात डुप्लेसीस आणि मोईन अली दोघे लागोपाठ बाद झाल्यानंतर सुरेश रैना आणि रविंद्र जडेजाने अधिक पडझड न होउ देता चेन्नईला विजय मिळवुन दिला. यावेळी सुरेश रैनाने १५ चेंडुत ३ चौकारासह १७ धावांची नाबाद खेळी केली. यादरम्यान रैनाने पहिला चौकार मारताच आयपीएलमध्ये ५०० चौकार पुर्ण केले.
5️⃣0️⃣0️⃣x4
We know he likes to hit big and @ImRaina now has struck his 500th boundary in #VIVOIPL https://t.co/dvbR7X1Kzc #VIVOIPL #CSKvSRH pic.twitter.com/u6nV1nav83
— IndianPremierLeague (@IPL) April 28, 2021
रैनाच्या नावावर आता ५०२ चौकार जमा आहेत तर २०२ षटकारही त्याने आपल्या नावे केले आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार हे दिल्ली कॅपीटल्सचा सलामीवीर शिखर धवन याने मारले आहेत. धवनने आतापर्यंत तब्बल ६२४ चौकार लगावले आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या डेव्हिड वॉर्नरने ५२५ चौकार लगावले आहे. तर आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीच्या नावावर ५२१ चौकार जमा आहेत.
महत्वाच्या बातम्या
- राजीव सातव यांची प्रकृती खालावली,राहुल गांधींचा डॉक्टरांना फोन,मुंबईहून लीलावतीमधील टीम पुण्यात
- चेन्नई एक्सप्रेस सुसाट; हैदराबाद संघावर ७ गडी राखुन मात
- ऑक्सिजन अभावी दौंडमध्ये ४ रुणांचा मृत्यू, नातेवाईकांचा हॉस्पिटलवर आरोप
- अखेर दीपाली चव्हाण प्रकरणी निलंबित वनसंरक्षक एम एस रेड्डीला अटक
- ‘दिलेला शब्द पाळा, केंद्रावर जबाबदारी ढकलू नका’ पंकजांनी ठाकरे सरकारला सुनावले


