🕒 1 min read
Uddhav Thackeray | मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरून सध्या राज्यातील राजकारण तापलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं. या घटनेला आता सात दशकांहून जास्त काळ उलटला. मात्र, कर्नाटकसोबत असलेला सीमाप्रश्न अजूनही सुटलेला नाही. सीमाभागातील अनेक गावांना महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा असल्याचा दावा सातत्याने महाराष्ट्राकडून केला जात आहे. बेळगावमध्ये यावरून मोठा संघर्ष पाहायला मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना टोला लगावला आहे.
आज ठाण्यात आंबेडकरवादी विचारांच्या काही कार्यकर्त्यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम पार पडला. यावेळी उद्धव ठाकरेंनी राज्यपालांच्या वक्तव्याबाबत देखील सुनावलं.
“महाराष्ट्र हा शाहू, फुले आणि आंबेडकरांचा आहे, असं आपण म्हणतो. पण फुले-आंबेडकरांचा अपमान करणारा माणूस राज्यपाल पदावर बसलेला असेल आणि तोच माणूस आज पंतप्रधानांच्या व्यासपीठावर बसलेला असेल, तर महाराष्ट्राच्या जनतेनं समजायचं काय?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.
पुढे ते म्हणाले, “एका बाजुला महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पेटला आहे. महाराष्ट्राच्या बाजुने कुणीच बोलत नाहीये. कर्नाटकचे मुख्यमंत्री अतिशय मस्तीत किंवा माज आल्यासारखं बोलत आहेत आणि आपले मुख्यमंत्री मात्र त्यांना स्क्रीप्ट लिहून दिलंय तेवढंच बोलत आहेत. हा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे, असंच ते म्हणत आहेत. पण महाराष्ट्र जसा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत आहे, तसंच कर्नाटकनेही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट बघायला काय हरकत आहे.”
महत्वाच्या बातम्या :
- NCP | “मनोज गरबडे वर अन्याय झाला तर कायदेशीर मदत करणार”; शाईफेक प्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं विधान
- Jayant Patil | “निर्भया फंडांतून घेतलेल्या पोलीस गाड्यांचा वापर फुटीर आमदारांच्या…”; जयंत पाटलांचा दावा काय?
- Jitendra Awhad | चंद्रकांत पाटील यांच्या विषयी केलेलं ‘ते’ ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केलं डिलीट; चर्चांना उधाण
- Ajit Pawar | “मी कधीतरी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना नक्की विचारेन की…”; अजित पवारांची बोचरी टीका
- Rohit Pawar | “चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य योग्य नव्हतंच, पण शाईफेक…”; रोहित पवारांनी स्पष्ट केली भूमिका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
