Share

हेरवाड ग्रामपंचायतीच्या ‘त्या’ निर्णयाचे सुप्रिया सुळेंनी केले कौतुक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृतीशताब्दी वर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने राजर्षींचा पुरोगामीत्वाचा वारसा जोपासत विधवा प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी जनजागृती ठराव केला. याचेच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कौतुक केले आहे.

“पतीच्या निधनानंतर महिलेच्या हातातील बांगड्या फोडणे, कुंकू पुसणे आदी प्रथा पाळल्या जात होत्या. या प्रथांना हेरवाड ग्रामपंचायतीने दूर करत एक नवा विचार मांडला होता. अशा प्रकारच्या प्रथा दूर करण्यासाठी हेरवाडच्या धर्तीवर राज्यभरात जिल्हा परिषदेने आपल्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतींना जनजागृती करण्याबाबत प्रोत्साहित करावे असा शासन आदेश काढला आहे.”, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत दिली आहे.

राज्अय शासनाचे हे अतिशय महत्वाचे असे पुरोगामी पाऊल असून याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार आणि महाविकास आघाडी सरकारचे सुप्रिया सुळे यांनी आभार व्यक्त केले आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!