🕒 1 min read
पुणे : पुण्यातील कोथरूड परिसरात सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने सरकारचा निषेध केला आहे. पेट्रोल, डिझेल, सीएनजी, घरगुती गॅसच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादीने जन आक्रोश आंदोलन केलं आहे. घरगुती वापराच्या वस्तूंवर लावलेल्या जीएसटीच्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत आहे. यादरम्यान खासदार सुप्रिया सुळे यांना रोहित पवार यांच्यावर होत असलेल्या चौकशी बाबत विचारलं असता आमच्या कुटुंबातील कोणालाही नोटीस आलेली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
“आम्हाला लपवायची गरज नाही” – सुप्रिया सुळे
रोहित पवार यांच्याशी माझा संवाद झाला असून रोहित पवारांवर कोणतीही चौकशी सुरू झालेली नाही. अशा बातम्या केवळ माध्यमांमध्ये सुरू आहेत. प्रिलीमिनरी इंक्वायरी सुरू झाल्याच्या बातम्या येत आहेत, त्यांना अद्याप नोटीस आलेली नाही. मात्र, आमच्यापैकी कोणालाही नोटीस आली तर आम्ही नेहमीच सहकार्य करु. माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आम्हाला लपवायची गरज नाही, काही चौकशी झाली तर आम्ही उत्तर देऊ, असं सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान, सुप्रिया सुळे यांनी भाजप आणि मनसेला देखील यावेळी टोला लगावला आहे. भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा एक पार्टी एक देश, असं म्हणतात. मात्र आमचं या उलट आहे. आम्ही संविधान मानणारे लोक आहोत आणि एक देश अनेक पक्ष राहिलेच पाहिजे. त्यामुळे उद्या निर्मला सीतारामन देखील बारामतीत त्यांचा पक्षाचा प्रचार करायला आले तरी मी स्वागत करीन. त्यांनाही त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. मनसेने देखील त्यांचा प्रचार करावा. आम्हाला काही अडचण नाही. आम्हाला आनंद होईल, कारण माझं माझ्या मतदारसंघावर प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे जो लोकप्रतिनिधी या मतदार संघाला पुढे घेऊन जाईल त्याला न्याय मिळालाच पाहिजे. म्हणूनच तर संविधान आहे आणि महत्त्वाचं म्हणजे बारामती सगळ्यांनाच हवीहवीशी आहे आणि याचं हे प्रमाणपत्र असल्याचा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्याः
- IND vs PAK | “मला माहित माझ्यापेक्षा…” ; रोमांचक सामना जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याची ‘त्या’ षटकारावर प्रतिक्रिया
- Gulabrao Patil | “आमच्याकडे बायको नांदत नाहीत तो पण…” ; गुलाबराव पाटलांचे वादग्रस्त विधान
- Mohit Kamboj | मोहित कंबोज यांच्या ट्विटवर रोहित पवार यांची प्रतिक्रीया, ईडीची देखील चौकशी नसल्याचं स्पष्ट
- GulabRao Patil | “…तर आम्ही मंत्रीपद सोडून देऊ”; गुलाबराव पाटील यांचं चॅलेंज
- Nitin Gadkari | “मी विहरीत जीव देईल, पण काँग्रेस मध्ये जाणार नाही” – नितीन गडकरी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
