टीम महाराष्ट्र देशा : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्ष चांगलेच सक्रीय झालेले आहेत. याच पार्श्वभूमीवर नेते आणि कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संवाद दौरा काढला आहे.
यानिमित्त सुप्रिया सुळे अहमदनगरमध्ये आल्या होत्या. यावेळी बोलताना त्यांनी पक्षांतरावरून भाजपवर जोरदार टीका केली. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये असताना वाईट असणारे लोक भाजपमध्ये आल्यावर स्वच्छ कसे ठरतात? त्यासाठी कोणती वॉशिंग पावडर वापरली जाते? भाजपनं त्या पावडरचं नाव सांगावं अशा शब्दात भाजपवर हल्लाबोल केला.
तसेच पुढे बोलताना सुळे यांनी ‘आमचे बरेच लोक तिकडे गेले असल्यानं सत्ता कोणाचीही आली तरी आमचे लोकच सत्तेत असतील, असं त्या म्हणाल्या. तसेच वाढती बेरोगजारी व आर्थिक मंदीमुळं सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे अस विधान सुळे यांनी केले. त्याचबरोबर देशात ११ राज्ये अशी आहेत, जिथं बाहेरच्या व्यक्तीला जमीन विकत घेता येत नाही. इतकंच काय, मोदी सरकारने नागालँडसाठी स्वतंत्र घटना करण्यास मान्यता दिली आहे असा आरोपही सुळे यांनी मोदींवर केला आहे.
दरम्यान, संवाद दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्या सहा जिल्ह्यात जाणार आहेत. या दौऱ्यात त्या राज्यातील पूर परिस्थिती, दुष्काळ, बेरोजगारी, महिला सुरक्षा, ढिसाळ कारभार याचा आढावा घेणार आहेत. या पहिल्या टप्प्यात अहमदनगर, सोलापूर, जळगाव, नाशिक, ठाणे, नागपूर, नवी मुंबई या जिल्ह्यांंचा संवाद दौरा सुप्रिया सुळे करणार आहेत.
- महापुरुषांची विटंबना करणं ही एक विकृती, रिपाईचा हल्लाबोल
- जनतेने नाकारलेल्या राज ठाकरेंवर सूड उगवून आम्हाला काय फायदा : फडणवीस
- सावरकरांच्या पुतळ्याची विटंबना : सोलापुरात सुशीलकुमार शिंदेंच्या फोटोला काळे फासले
- अण्वस्त्र हल्ल्याची धमकी देणाऱ्या पाकिस्तानी नेत्याला लंडनमध्ये तुडवलं
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

