पुणे : राज्यात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण हे पुण्यातच आढळून आले आहेत. पुण्यात 1 आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 6 असे ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले होते. मात्र आता पुणेकरांसाठी दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.
पुण्यातील ओमायक्रॉनचा एकमेव रुग्ण बरा झाला आहे. तर पिंपरी-चिंचवड मधील 6 पैकी 4 ओमायक्रॉनचे रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. ‘कोविड अन् ओमयक्रोनसाठी सरकार, राज्य प्रशासन सज्ज आहे. 2 डोस घेतलेल्यांना ओमयक्रोनची भीती नसते आणि त्यामुळे दोन्ही डोस घेतले पाहिजेत’, असंही अजित पवार म्हणाले आहेत.
पुणे जिल्ह्यात पहिल्या डोसचे लक्ष पूर्ण झालं आहे, असंही अजित पवारांनी सांगितलं आहे. पिंपरी चिंचवडमधील 6 पैकी 4 ओमायक्रोन रुग्ण निगेटिव्ह झाले आहेत. यात 44 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, 7 आणि दीड वर्षीय मुलींचा समावेश आहे. तर 12 आणि 18 वर्षीय मुलींचे अहवाल प्रतिक्षेत आहेत.
दुसऱ्या डोसचे प्रमाण पहिल्या डोसच्या तुलनेत कमी आहे. ओमायक्रॉनमुळे लोक दुसऱ्या डोसलाही प्रतिसाद द्यायला लागले आहेत. पण जुन्नर, दौंड, पुरंदर आणि बारामती या 4 तालुक्यात डोसचे प्रमाण कमी आहे. ते वाढवण्यास प्रशासनास सांगितले आहे. येत्या आठवड्यात आम्ही या 4 तालुक्यात दुसऱ्या डोससाठी प्रयत्न करणार आहोत. परंतु पुढच्या आठवड्यात या 4 तालुक्यातील नागरिकांनी याला प्रतिसाद नाही दिला तर पुढील आठवड्यात आम्ही कडक निर्णय घेणार आहोत, असेही अजित पवार यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘त्या’ धमकी पत्राचा संबंध भाजपशी जोडला नाही; अतुल भातखळकरांची प्रतिक्रिया
- महाविकास आघाडी सरकार 25 वर्षे टिकणारच; सुप्रिया सुळेंचा विश्वास
- महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकी; कुटुंबातील सर्वांना संपवण्याचा पत्रातून इशारा
- संपूर्ण देश बिपिन रावत यांच्या निधनाने शोक व्यक्त करतंय, मात्र गुणरत्न सदावर्ते विचारतात…
- भारत लोकशाही मूल्ये मजबूत करण्यासाठी तयार- पंतप्रधान मोदी
- …म्हणून आयसीसीच्या तीन स्पर्धांमध्ये भारतीय संघाचा पराभव झाला; रोहितचे मोठे वक्तव्य


