🕒 1 min read
सिंधुदुर्ग : भाजप नेते नारायण राणे यांचा ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या मेडिकल कॉलेजचं आज सिंधुदुर्गात उद्घाटन करण्यात आलं आहे. नारायण राणे यांनी उभारलेल्या लाईफटाईम हॉस्पिटलचं लोकार्पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पार पडलं आहे. यावेळी, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, विनोद तावडे, राणेंचे दोन्ही सुपुत्र- निलेश राणे व आमदार नितेश राणे हे यावेळी मंचावर उपस्थित होते.
या कार्यक्रमावेळी बोलताना भाजप नेत्यांनी नारायण राणेंचं चांगलंच कौतुक केलं आहे. तर, अमित शाहांनी देखील नारायण राणेंचं कौतुक केलं. अमित शाह यांनी उपस्थिती लावल्यामुळे या कार्यक्रमाकडे राज्यच लक्ष होतं. यावेळी सुरुवातीला त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा उल्लेख केला, नंतर देशातील कोरोना स्थितीमध्ये केंद्र सरकारने राबवलेल्या उपाययोजनांवर भाष्य केलं. तर, नारायण राणे यांचं कौतुक केल्यानंतर महाविकास आघाडी व शिवसेनेवर प्रहार देखील त्यांनी केला.
त्यांच्या या उपस्थितीनंतर आमदार नितेश राणे यांनी आभार मानले आहेत. ‘ते आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकलं ! लाइफटाईम मेडिकल कॉलेजच्या उदघाटनासाठी आल्याबद्दल धन्यवाद. येत्या काळात कोकणात भाजपचं नंबर एकच पक्ष करण्यासाठी तुमच्या शब्दांनी आम्हाला पुरेसं सामर्थ्य दिलं आहे.’ असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.
He came..he saw.. he conquered!
Thank u to Hon @AmitShah ji for coming n inaugurating Lifetime medical college!
Ur words have given all of us enough strength to ensure BJP becomes No1 in Kokan in the coming times! pic.twitter.com/zlu6w047oE— Nitesh Rane (@NiteshNRane) February 7, 2021
महत्वाच्या बातम्या
- पियुष गोयल शेतीतज्ज्ञ आहेत हे कळाल्याने माझ्या ज्ञानात भर पडली : शरद पवार
- महापुरुषांना जातीपातीच्या चौकटीत अडकवणं चुकीचं – पालकमंत्री धनंजय मुंडे
- भांडवलदारांना कृषी व्यवसायात चंचूप्रवेश देण्याचा मोदींचा डाव; ‘या’ मंत्र्याचा आरोप
- शेतकरी आंदोलनावरील आंतरराष्ट्रीय प्रतिक्रियांवर पंतप्रधानांच भाष्य
- भीषण : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला उत्तराखंड दुर्घटनेचा आढावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
