मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे सर्व विद्यापीठांच्या अंतिम वर्ष वगळता परीक्षा रद्द करण्यात आल्या. तर, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, ओडिशासह अन्य काही राज्यांनी अंतिम वर्ष परीक्षा रद्द करण्याचे देखील जाहीर केले होते. मात्र, युजीसीने अंतिम वर्ष परीक्षा घेण्याचे निर्देश दिल्यानंतर याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. परीक्षेची तारीख बदलू शकते मात्र परीक्षा रद्द होणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. परीक्षांसंदर्भात यूजीसीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलं आहे. यामुळे आधीच भविष्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली असतानाच विद्यार्थ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
पुणेकरांनो मास्क वापरा अन्यथा हजार रुपये दंड भरा!
विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीला आणि त्यांच्या भविष्याबाबत निर्माण झालेल्या अस्थिरतेला राज्य सरकार व मंत्री जबाबदार असल्याचे आरोप भाजपाने लावले आहेत. यावर आता राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल अनपेक्षित असल्याचे म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने #finalyearexams बाबत घेतलेला निर्णय अनपेक्षित आहे. मात्र आम्ही या निर्णयाचा अनादर करणार नाही. या निर्णयाच्या अनुषंगाने पुढील दिशा घेण्यासंदर्भात आजच सविस्तर चर्चा करणार आहोत. विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये. एक मोठा भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
— Prajakt Prasadrao Tanpure (@prajaktdada) August 28, 2020
” सर्वोच्च न्यायालयाने अंतिम वर्ष परीक्षाबाबत घेतलेला निर्णय अनपेक्षित आहे. मात्र आम्ही या निर्णयाचा अनादर करणार नाही. या निर्णयाच्या अनुषंगाने पुढील दिशा घेण्यासंदर्भात आजच सविस्तर चर्चा करणार आहोत. विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये. एक मोठा भाऊ म्हणून मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, ” असा विश्वास देखील त्यांनी ट्विट करून दिला आहे.
..अन फडणवीस म्हणाले माझा आवाज कोणी दाबू शकत नाही; अजित पवारांच्या गालावर आलं हसू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

