🕒 1 min read
मुंबई : विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. परीक्षेची तारीख बदलू शकते मात्र परीक्षा रद्द होणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टानं दिला आहे. परीक्षांसंदर्भात यूजीसीच्या निर्णयावर सुप्रीम कोर्टानं शिक्कामोर्तब केलं आहे. यामुळे आधीच भविष्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली असतानाच विद्यार्थ्यांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानाचे तसेच गेले अनेक महिने संभ्रमामुळ ज्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले त्याचे खापर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर फोडले आहे. तसेच, या निकालानंतर त्यांनी युवासेनाध्यक्ष व मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर देखील अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
..अन फडणवीस म्हणाले माझा आवाज कोणी दाबू शकत नाही; अजित पवारांच्या गालावर आलं हसू
यावर आता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राज्य सरकारने अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षांबाबत आरोग्याचा प्रश्न लक्षात घेऊन त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. प्रतिज्ञापत्रात आम्ही या परिस्थितीत परीक्षा घेऊ शकत नाही असं कळवले होते. तसेच विद्यार्थ्यांना परीक्षेचा निर्णय घेण्याबाबत ऐच्छिक मुभा द्यावी अशी मागणी केली होती. मात्र तसे करता येणार नाही हे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे, असं उदय सामंत म्हणाले.
तुकाराम मुंढेंच्या कार्यशैलीमुळे आंदोलनाच्या मूडमध्ये राहणारे महापौर आलेत एक्शन मूडमध्ये
ट्विटच्या माध्यमातून जे टीकाटिप्पणी करत आहेत, त्यांनी भान ठेवावं. 30 सप्टेंबरच्या डेडलाईनबाबत बंधन नाही. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन याबाबत राज्याची भूमिका UGC समोर मांडेन. मन स्वच्छ ठेऊन 100 विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात मत विचारावं, त्यानंतर टीका करावी. स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी युवा सेनेवर टीका केली जाते, अशी खरमरीत टीका यावेळी त्यांनी भाजपा नेत्यांवर केली आहे.
भाजपा आमदार आशिष शेलार काय म्हणाले ?
“कुलपती म्हणून मा.राज्यपालांना, कुलगुरूंना विश्वासात घेतले नाही..शिक्षण तज्ञांची मते घुडकावली…युजीसीला जुमानले नाही…मंत्री मंडळात चर्चा केली नाही… विद्यार्थ्यांना अखेर पर्यंत वेठीस धरले..अहंकारातून विद्यार्थ्यांचे एवढे महिने नुकसान केले…काय साध्य केले?” असा सवाल उपस्थित केला.
“एका ‘बबड्याच्या’ हट्टापायी राज्यातील 10 लाख विद्यार्थ्यांना नाहक मानसिक त्रास दिला…त्यांच्या शैक्षणिक वर्षाचा खेळखंडोबा केला…आम्ही या निर्णयाचे धोके वारंवार सांगत होतो पण.. अहंकार…! ऐकतो कोण?मा. सर्वोच्च न्यायालयाने अखेर न्याय दिला!” अशी बोचरी टीका उल्लेख न करता आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीवर केली आहे.
यासोबतच, “महाराष्ट्रातील ‘पाडून दाखवा सरकारने’ स्वतःच्या अहंकारातून स्वतःच तोंडावर पडून दाखवले! पण…विद्यार्थी मित्र, मैत्रिणींनो खचून जाऊ नका… परिस्थितीला धैर्याने समोरे जाऊ या..यश तुमच्या वाट्याला नक्की येईल…तुमचे भविष्य उज्वलच आहे!!” असा धीर देखील त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
