Share

पुणेकरांनो मास्क वापरा अन्यथा हजार रुपये दंड भरा!

Published On: 

पुणे : गेले ५ महिने देशासह राज्यात कोरोनाने कहर माजवला आहे. देशात कोरोना बाधितांमध्ये उच्चांकी वाढ होताना दिसत आहे, तर महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. राज्यात कोरोनाने शिरकाव केल्यापासूनच मुंबई, पुण्यासह अन्य जिल्ह्यात थैमान घातले होते. यानंतर, मुंबईमध्ये कोरोना आटोक्यात आल्याचे आकड्यांवरून दिसून आले.

पुणे जिल्ह्यात मात्र दिवसेंदिवस कोरोनाबाधितांमध्ये वाढ होत असून कोरोनामुक्तांचे प्रमाण जरी वाढत असले तरी नव्या कोरोना रुग्णांचा आकडा आटोक्यात येणे गरजेचे आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मास्क न वापरणाऱ्यांना 1000 रुपये दंड करण्याचा विचार असल्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

त्यांनी विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात मत विचारावं त्यानंतर टीका करावी; मंत्री उदय सामंतांचा भाजपावर पलटवार

अजित पवार यांच्यासह राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पिंपरी-चिंचवडमधील २०० ऑक्सिजन बेड्सच्या उभारणी केलेल्या रुग्णालयाचे व बाणेरमधील कोव्हिड केअर सेंटरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अजित पवार म्हणाले, सध्या मास्क वापरणाऱ्यांना पाचशे रुपये दंड करण्यात येतो. परंतु आता तो आणखी वाढवण्याचा विचार आहे.

..अन फडणवीस म्हणाले माझा आवाज कोणी दाबू शकत नाही; अजित पवारांच्या गालावर आलं हसू

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढते आहे. त्याचबरोबर कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाणही वाढलं आहे. मात्र तरीही नागरिक आवश्यक ती काळजी घेत नाहीत. मास्क वापरण्यासाठी वारंवार सूचना दिल्यानंतर देखील लोक मास्क वापरत नाहीत आणि त्यामुळे आता दंडाची रक्कम वाढवावी लागेल असे अजित पवार यांनी म्हटलं आहे.

तुकाराम मुंढेंच्या कार्यशैलीमुळे आंदोलनाच्या मूडमध्ये राहणारे महापौर आलेत एक्शन मूडमध्ये

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!