पुणे : आज उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दोघेही पुणे दौऱ्यावर आहेत. सकाळी त्यांनी पिंपरी-चिंचवड मधील जम्बो २०० ऑक्सिजन बेड युक्त जम्बो रुग्णालयाचे लोकार्पण केल्यानंतर पुण्यातील बाणेर येथील कोव्हिड सेंटरचे उद्घाटन देखील त्यांनी केलं.
या लोकार्पणावेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आल्याने राज्यभरात या सोहळ्याची चर्चा रंगली आहे. तर, यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकात पाटील, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ हे देखील उपस्थित होते.
तुकाराम मुंढेंच्या कार्यशैलीमुळे आंदोलनाच्या मूडमध्ये राहणारे महापौर आलेत एक्शन मूडमध्ये
या कार्यक्रमादरम्यान देवेंद्र फडणवीस भाषण करताना माईकमधून आवाज येत नव्हता. त्यावेळी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी आवाज आवाज असं सांगितलं. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी मास्क खाली घेऊन, माझा आवाज कोणी दाबू शकत नाही, असे म्हणताच देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूला असलेले अजित पवार यांना हसू आवरता आले नाही.
दरम्यान, पिंपरी-चिंचवडमधील लोकार्पण सोहळ्यावेळी अजित पवार यांनी, “विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मी, आम्ही दोघे कार्यक्रमाला येणार म्हणून ब्रेकिंग न्यूज येत होती. त्यांना माहीत नव्हतं, की भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील येणार आहेत म्हणून. राजकीय भूमिका आणि मतं वेगवेगळी असू शकतात, मात्र निवडणूक झाल्यावर सगळं विसरुन जावं” असा टोला यावेळी लगावला.
नागपुरात नितीन गडकरी यांच्या विरोधात घोषणा, वाचा काय आहे प्रकरण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

