🕒 1 min read
मुंबई : एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष आता चांगलाच पेटलेला दिसतोय. एकीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिंदे गटाला चेतावणी देताना पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे शिंदे गटातील बंडखोर आमदारांकडूनही शिवसेनेतील नेत्यांवर वारंवार टीका केली जात आहे. एकनाथ शिंदे गटाकडून शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाणावरच दावा ठोकण्यात आला आहे. उद्धव ठाकरे ही धनुष्यबाण हाच शिवसेनेकडेच राहील असे बोलत आहेत. त्यामुळे आता हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे पोहोचले होते. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना कागदी पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते. निवडणूक आयोगाच्या याच आदेशाला स्थगिती देण्यासाठी शिवसेनेकडून सुप्रीम कोर्टात अर्ज करण्यात आला होता. सुप्रीम कोर्टाने हा अर्ज मान्य करून त्यावर आता सुनावणी करण्यची तयारी दर्शविली आहे.
१ ऑगस्ट रोजी याबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. त्याचबरोबर या अगोदरही शिवसेना व शिंदे गट यांच्याकडून दाखल झालेल्या सर्व याचिकांवरही सुनावणी होण्याची शक्यता आहे. धनुष्यबाणाच्या लढाईत निवडणूक आयोगाने या दोन्ही गटांना ८ ऑगस्टपर्यंत कागदी पुरावे सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे शिवसेनेकडून या आदेशाला स्थगिती द्यावी अशी विनंती याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. त्यावर आता कोर्टाने हा याचिका अर्ज मान्य केला असून १ला ऑगस्टला यावर सुनावणी होणार आहे.
Supreme Court to hear the fresh plea of Uddhav Thackeray-led camp of Shiv Sena on August 1 seeking a stay on the proceedings before the Election Commission of India on Eknath Shinde group's claim for recognition as 'real' Shiv Sena
(File Pics) pic.twitter.com/0HSr45Z5M8
— ANI (@ANI) July 26, 2022
शिवसेनेच्या ४० आमदारांनी तसेच, लोकसभेतील १२ खासदारांनी बंडखोरी केली आहे. मात्र, ही बंडखोरी नसून, आमचा पक्ष खरी शिवसेना आहे, असा दावा शिंदे गटाने केला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिंदे गट आणि भाजप युती सरकारला शपथही दिली आहे. लोकसभाध्यक्षांनीही १२ खासदारांच्या बहुमताच्या पाठिंब्यावर गटनेता बदलण्यासही मान्यता दिली आणि विनायक राऊत यांच्याऐवजी राहुल शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली. यानंतर रिलेटेड आणि सर्वोच्च न्यायालयाकडे धाव घेत शिवसेनेचे चिन्ह धनुष्यबाणावरच आपला दावा ठोकला आहे. त्यामुळे आता धनुष्यबाणाच्या संघर्षात विजय कोणाचा होतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- sanjay raut | खोतकर म्हणाले, दानवेंना गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; संजय राऊतांचा खुलासा
- Uddhav Thackeray | “मुले आईला विकायला बाहेर पडली, हे अतिशय…” ; उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात
- Uddhav Thackeray | “2 नंबरच्या नेत्याने 2 नंबरचे काम केले” ; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
- Sanjay Shirsat | ‘बाळासाहेब ठाकरे’ तुमची प्रॉपर्टी नाही, ते प्रत्येक शिवसैनिकाचं दैवत ; संजय शिरसाट यांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
- Sandip Deshpande : “अडीच वर्षे संपत्ती झाली आता पुढची…”, संदीप देशपांडेंची उध्दव ठाकरेंवर खोचक टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

