Share

‘आधी बाण सोडा, बॉम्ब फोडा आणि मग सॉरी म्हणा’

Published On: 

मुंबई : एका मुलाखतीतील अभिनेता सैफच्या वक्तव्यामुळे लोक भडकले आहे. हिंदू भावना दुखावल्या गेल्यास ते सहन केले जाणार नाही.’ चित्रपटासंदर्भात सैफ अली खानने केलेल्या एका वक्तव्यामुळे लोकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आणि सोशल मीडियावर #BoycottAdipurush ट्रेंड केला जात आहे. यावरच वाढत्या वादाला बगत सैफ अली खानने सगळ्यांची माफी मागितली आहे. कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू न्हवता असं म्हटलं आहे.

सैफने स्पष्ट केलं कि, मला असं कळलंय कि माझ्या मुलाखतीमुळे प्रचंड गदारोळ पसरला आहे. आणि यामुळे लोकांच्या भावनाही दुखावल्यात कुणाला दुखावण्याचा माझा हेतू न्हवता किंवा मला असं काही म्हणायचं न्हवत मी मनापासून माफी मागत. आणि माझं वक्तव्य मागे घेतो. प्रभू श्रीराम कायमच माझ्यासाठी शक्ती आणि सामर्थ्याच प्रतीक आहेत. आदिपुरुषच्या माध्यमातून दुर्जनांवर सज्जनांचा मोठा विजय दाखवला आहे आणि संपूर्ण टीम याच दृष्टीने काम करत आहे. यात कुठलेही बदल नाही असं सैफने स्पष्ट केलं आहे.

यावरच आता त्याच्या या माफीनाम्याचीच निंदा होतेय. ‘महाभारत’ या मालिकेत भीष्म पितामहची भूमिका साकारणारे अभिनेते मुकेश खन्ना यांनी सैफवर जोरदार हल्ला चढवत, संताप व्यक्त केला आहे. एक इन्स्टा पोस्ट शेअर करत मुकेश खन्ना यांनी सैफवर जोरदार टीका केली.

‘सैफला रावणाची भूमिका साकारणे इंटरेस्टिंग वाटतेय. आम्ही रावणाची भूमिका मनोरंजक पद्धतीने सादर करू, सीताहरणही न्यायसंगत ठरवू, असे सैफ एका मुलाखतीत म्हणाला. हे इतके सोपे आहे, असे सैफला का वाटतेय? लंकेश काही चेंडू नाही, ज्याला तुम्ही वाट्टेल तसे टोलवाल. याला मी सैफचे अज्ञान म्हणून की मूर्खपणा.

तुम्ही देशाच्या कोट्यावधी भारतीयांच्या आस्थेशी खेळत आहात, हेही त्याला कळू नये? हिंमत असेल तर दुस-या धर्माबद्दल असे करून दाखव? चांगल्याला वाईट दाखव, वाईटाला चांगले दाखव. आता म्हणे सैफ माफी मागतोय. व्वा, क्या बात है. बाण सोडा, बॉम्ब फोडा आणि मग सॉरी म्हणा. तुझी सॉरी आम्हाला मान्य नाही. बोलण्यापूर्वी विचार का केला नाहीस? ‘अशा शब्दांत त्यांनी सैफला फटकारले आहे.

https://www.instagram.com/tv/CId07bBJy1m/?utm_source=ig_web_copy_link

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!