नवी दिल्ली : अन्वय नाईक प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. या प्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला अटक केली आहे. सोमवारी अर्णबच्या जामीनावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने दिलासा न देता न्यायालयीन कोठडी सुनावलेल्या अलिबाग सत्र न्यायालयात जामीनासाठी पुन्हा याचिका दाखल करण्यास सांगितले.
उच्च न्यायालयात जामीन दिल्यास ते बेकायदेशीर ठरेल असा निकाल उच्च न्यायालयाने दिला आहे. न्यायालयाने अंतरिम जामीन नाकारल्यानंतर उच्च न्यायालयाच्या या आदेशाविरोधात अर्णबच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात ‘तात्काळ सुनावणी’साठी सूचीबद्ध करून अर्णबच्या जामीनावर आजच सुनावणी घेण्यात आली.
सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारने केलेल्या कारवाईवर ताशेरे ओढले आहेत. बराच काळ चाललेल्या या सुनावणीनंतर अखेर सर्वोच्च न्यायालयाने अर्णबच्या सुटकेचे आदेश दिले आहेत, सर्वोच्च न्यायालयाने नुकतंच अंतरिम जामीन मान्य केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘महाराष्ट्रातील निवडणुकांवेळी भाजपाचाच मुख्यमंत्री होईल, असे जाहीरपणे सांगण्यात आले होते’
- अंतिम सामन्यात घडलेल्या ‘त्या’ चुकीबाबत रोहित शर्मा म्हणतो…
- पारनेर नगरपंचायत सोडतीत कही खुशी, कही गम; आजी, माजी उपनगराध्यक्षांचे प्रभाग राखीव !
- चाहत्यांना संदेश देण्यासाठी रणवीर सिंग चढला गाडीच्या टपावर; रणवीरच्या हटके स्टाइलची चर्चा !
- टेलिकॉमनंतर मुकेश अंबानी करणार रिटेल क्षेत्रात प्रवेश ! अॅमेझॉन, वॉलमार्टला देणार टक्कर

